अॅग्रीबझारचा रिवुलिससोबत सामंजस्य करार

भारताच्या कृषी उत्पादनाचा वेग वाढवण्यासाठी आले एकत्र ~


मुंबई, ११ एप्रिल २०२२ : अॅग्रीबझार या भारतातील आघाडीच्या वन स्टॉप अॅग्रीटेक प्लॅटफॉर्मने रिवुलिस या सूक्ष्म जलसिंचन उत्पादने आणि उपाययोजनांच्या क्षेत्रातील जागतिक आघाडीच्या कंपनीसोबत भागीदारी केली आहे. या भागीदारीचा भाग म्हणून अॅग्रीबझार शेतकऱ्यांना आपल्या प्लॅटफॉर्मवर रिवुलिसची वर्गातील सर्वोत्तम शेती जलसिंचन व्यवस्थापन उत्पादने आणि उपाययोजना वापरून आपल्या शेतातील उत्पादन वाढवण्यासाठी प्रोत्साहित करेल.


या भागीदारीच्या पहिल्या टप्प्यात अॅग्रीबझार आपल्या प्लॅटफॉर्म्सवर ऊस उत्पादक शेतकऱ्यांना रिवुलिसची ठिबक सिंचन उत्पादने खरेदी करून स्थापित करण्याच्या सुविधा देईल. त्यानंतरच्या काळात या सेवा सध्या अॅग्रीबझारच्या प्लॅटफॉर्मवर नोंदणीकृत केलेल्या तीन लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिल्या जातील.


अॅग्रीबझारच्या वतीने सामंजस्य करारावर स्वाक्षरी करताना सहसंस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक श्री. अमित मुंडावाला म्हणाले की, "अॅग्रीबझारमध्ये आम्ही भारताच्या कृषी क्षेत्रासाठी अधिक भरभराट आणण्यासाठी प्रयत्नशील आहोत. आमचा खास, एंड टू एंड सेवा पोर्टफोलिओ भारताच्या कृषी साखळीला कायम राखून तंत्रज्ञानाच्या शक्तीने त्याचे मजबूतीकरण करण्यासाठी सक्षम केला गेला आहे. रिवुलिससोबतची भागीदारी शेतकऱ्यांना वर्गातील सर्वोत्तम सुगीपूर्व तंत्रज्ञानाद्वारे सुविधा देण्याच्या प्रयत्नात महत्त्वाची ठरेल. मला खात्री आहे की, या भागीदारीमुळे आमच्या शेतकरी ग्राहकांना अधिक उत्पादन आणि जास्त किंमत मिळवणे शक्य होईल.”


रिवुलिस इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक श्री. कौशल जैस्वाल म्हणाले की, “रिवुलिसमध्ये आम्ही अॅग्रीबझारसोबत भागीदारीसाठी आणि शेतकऱ्यांना त्यांच्याकडील जमीनधारणा कितीही असली तरी स्मार्ट जलसिंचन पद्धतींचा वापर करण्यासाठी प्रोत्साहित करतो. आम्हाला खात्री आहे की, ही भागीदारी कृषी वातावरणात मूल्यवर्धन करेल आणि भारताच्या कृषी उद्योगात शाश्वतता आणून तिची कार्यक्षमता वाढवेल.”

Post a Comment

0 Comments