आयपीएलवर सट्टेबाजी करणाऱ्या दोघांना अटक

 


कल्याण  :  कल्याण एन एक्स या हायप्रोफाईल गेस्ट हाऊसच्या बंद खोलीत  आयपीएल किक्रेट मॅचवर सट्टेबाजी सुरु असल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात सट्टेबाजांवर गुन्हा दाखल करून दोघा बुकींना  बेड्या ठोकल्या आहेत. भावीन शामजी अनम,  मयूर हरीश व्यास असे अटक करण्यात आलेल्या क्रिकेट बुकींची नावे आहेत. 

 

आयपीएल किक्रेट मॅचचा हंगामा सुरु होताच किक्रेट बुकींसह सट्टा लावणारे सक्रिय झाल्याचे दिसून आले आहे. चार दिवसापूर्वी उल्हासनगर मधील एका मोबाईल शॉपमध्ये चोरीछुपे आयपीएल मॅचवर सट्टा घेणाऱ्या चार बुकींना लाखोंच्या मुद्देमालासह अटक केल्याची घटना ताजी असतानाच कल्याण रेल्वे स्थानकासमोरील कल्याण एन एक्स या हायप्रोफाईल गेस्ट हाऊसच्या एका बंद खोलीत चोरीछुपे आयपीएल मॅचवर सट्टा सुरु असल्याची माहिती महात्मा फुले पोलिसांना मिळाली होती.


 या माहितीच्या आधारावर ५ मार्च रोजी सायंकाळी याठिकाणी छापेमारी केली असता  बंद खोलीत आयपीएल मधील  आरसीसी विरुद्ध आरआर यांच्या सामना वेळी   ऑनलाईन लाखोंचा सट्टा सुरू  असल्याचे आढळून आले. यानंतर पंचनाम करत सट्टा घेण्यासाठी वापरलेले मोबाईल, इतर इलेट्रीकल  वस्तू  जप्त करून  दोन बुकींसह ११ सट्टा लावणाऱ्या विरोधात  महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. 


यातील दोन बुकींना  अटक केली आहे. ६ मार्च रोजी दुपारच्या सुमारास दोघा बुकींना कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Post a Comment

0 Comments