शरद पवारांच्या घरावरील हल्ल्याचा कल्याण मध्ये निषेध राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मांडला कल्याण मध्ये ठिय्या

कल्याण : राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबई येथील घरावर चप्पल फेकल्याचे पडसाद कल्याण मध्ये देखील उमटले असून या घटनेचा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त केला. कल्याण पश्चिमेतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे कल्याण डोंबिवली जिल्हा उपाध्यक्ष वल्ली राजन यांच्या नेत्तृत्वाखाली  कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत ठिय्या मांडला. यावेळी वल्ली राजन यांच्यासह राष्ट्रवादीचे माजी प्रदेश सचिव नोवेल साळवे, जिल्हा उपाध्यक्ष अॅड. प्रल्हाद भिलारे,  रामदास वळसे पाटील, प्रशांत माळी, भगवान साठे, योगेश माळी आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.


एसटी कर्मचाऱ्यांनी  शरद पवारांच्या मुबंईतल्या घराबाहेर आंदोलन केले. या आंदोलनादरम्यान शरद पवार यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत पवार यांच्या घरावर दगडफेक आणि चप्पलफेक करण्यात आली. या आदोलनंतर राष्ट्रवादीने आक्रमक पवित्रा घेतला आहे. या घटनेच्या निषेधार्थ कल्याणमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज  चौकात रस्त्यात बसून निदर्शने करत घटनेचा निषेध नोंदवला. यावेळी कार्यकर्त्यानी घोषणाबाजी करत शरद पवार यांच्या घरावर चपला फेकणाऱ्या समाजकंटकांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली.

Post a Comment

0 Comments