कल्याणात गुणवंत रंगकर्मीं सन्मान सोहळा उत्सवात साजरा


कल्याण ( शंकर जाधव )  अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद कल्याण शाखा व बालरंगभूमी परिषद कल्याण शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने  (जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस तथा अध्यक्ष ऑल इंडिया ड्रगिस्ट व केमिस्ट अध्यक्ष  जगन्नाथ (आप्पा) शिंदे यांच्या सहकार्याने  जागतिक रंगभूमीदिनानिमित्त गुणवंत रंगकर्मी सन्मान सोहळा बुधवारी कल्याण पश्चिम येथील मराठा मंदिर सभागृहात जल्लोषात साजरा करण्यात आला.      


कार्यक्रमाची सुरुवात नटराज पूजन व दीप प्रज्वलन करून करण्यात आली. याप्रसंगी सुप्रसिद्ध नाट्य सिनेतारका नयना आपटे लेखक, दिग्दर्शक, अभिनेते आनंद म्हसवेकर, ज्येष्ठ रंगकर्मी विवेक कानडे, नाट्य परिषद कल्याण शाखेचे अध्यक्ष व बालरंगभूमीचे कार्याध्यक्ष  शिवाजी शिंदे, उपाध्यक्ष सुरेश पवार, प्रीती बोरकर, प्रमुख कार्यवाह रविंद्र सावंत, कोषाध्यक्ष श्री विश्वनाथ गिरी बालरंगभूमी परिषद कल्याण शाखेचे अध्यक्ष सतीश देसाई, प्रमुख कार्यवाह सुजाता डांगे आदि  मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. 


 बालकलाकारांचे नृत्य व एकपात्री कार्यक्रमानंतर महाराष्ट्र शासन आयोजित अठराव्या बाल राज्यनाट्य स्पर्धेत नवी मुंबई व मुंबई केंद्रावर झालेल्या स्पर्धेत पारितोषिक प्राप्त बालकलाकार व तंत्रज्ञानाचा प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यात 'कलासंस्कृती' संस्था कल्याण, यांनी सादर केलेल्या 'गोष्टीची गोष्ट' या नाटकाला नवी मुंबई केंद्रात प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल संस्थेचा सत्कार करण्यात आला. 


सोबत याच नाटकाच्या दिग्दर्शन प्रथम क्रमांक रश्मी घुले, रंगभूषा द्वितीय क्रमांक दीपक कुंभार, अभिनय गुणवत्ता प्रमाणपत्र प्राप्त निमिषा मोरवणकर, यांना देखील सन्मानित करण्यात आले यानंतर या स्पर्धेतील 'चिमटा' या नाटकातील रौप्यपदक विजेती भैरवी जोशी तसेच स्पर्धेत अभिनय गुणवत्ता प्रमाणपत्र प्राप्त कलाकार तन्मयी चाटघोडे, चैतन्य चव्हाण, सुबोध जाधव, जेतश्री साळवे, आरव कांबळे, अथांग धारिया यांना देखील प्रशस्तीपत्र व शिल्ड देऊन सन्मानित करण्यात आले.


बालकलाकारांच्या  सत्कार सोहळ्यानंतर महाराष्ट्र शासन आयोजित ६० वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्ध्येत कल्याण केंद्रातून पुरस्कार प्राप्त संस्था, कलावंत व तंत्रज्ञाचा सत्कार करण्यात आला. प्रथम पुरस्कार प्राप्त नाटक 'हार्मनी बिटविन मिस्टर अँड मिसेस परस्पर' संस्था नवांकुर संस्कार मंच कल्याण, द्वितीय संस्था गंधर्व गुरुकुल प्रतिष्ठान, टिटवाळा नाटक 'स्टार' व तृतीय संस्था अभिनय कल्याण नाटक 'समतोल' तसेच दिग्दर्शन प्रथम सुशील शिरोडकर, द्वितीय राकेश जाधव, तंत्रज्ञ / नेपथ्य, द्वितीय समीर तोंडवळकर, रंगभूषा द्वितीय - वैजयंता डोंगरे, प्रकाश योजना द्वितीय - ऋषिकेश वायदंडे यासर्वांना प्रशस्तीपत्र व शिल्ड देऊन गौरविण्यात आले.


६० व्या राज्यनाट्य स्पर्ध्येत अभिनयाचे रौप्यपदक मिळविणारे कलावंत सुरेश पवार व सुजाता डांगे यांना सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. जागतिक रंगभूमी दिनाचे औचित्य साधून प्रतिवर्षाप्रमाणे वर्षभरातील विशेष कामगिरी करणाऱ्या कल्याणकर कलावंतांचा विशेष गुणगौरव सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येते. यावर्षी प्रा.डॉ.गणेश तरतरे, प्रा.डॉ.प्रदीप सरवदे, डॉ.प्रेम जाधव यांना पिचडी डॉक्टरेट पदवी मिळविल्याबद्दल व शुभांगी भुजबळ यांना झी मराठी वाहिनीवरील येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेत सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा झी मराठी पुरस्कार मिळविल्याबद्दल विशेष गुणगौरव सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. 


राज्य नाट्यस्पर्धेत कल्याण केंद्रावर अभिनय गुणवत्ता प्रमाणपत्र प्राप्त भाग्यश्री अशोक, अक्षता हाले, रंजना म्हाब्दी, सांची गांगण, श्रुती लाड, विकास तांबे, तुषार टेपे, कृणाल जाधव, सुमित चौधरी यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच गायत्री तरतरे हिला औरंगाबाद केंद्रात अभिनय गुणवत्ता प्रमाणपत्र मिळविल्याबद्दल गौरविण्यात आले.
 

प्रतिवर्षी प्रमाणे यावर्षीही जागतिक रंगभूमीदिनी ज्येष्ठ रांगकर्मी लेखक, दिगदर्शक, अभिनेते व निर्माते आनंद म्हसवेकर व अभिनेते, निर्मिती सूत्रधार विवेक कानडे या दोन जेष्ठ रंगकर्मींना सन्मान पत्र देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी नाट्य सिनेअभिनेत्री नयना आपटे यांनी नवोदित व बालकलाकारांना आपल्या खुमासदार शैलीत मार्गदर्शन केले. आनंद म्हसवेकर यांनी बालनाट्य हाच नाटकांचा मूळ पाया आहे इथूनच खरे नाट्य संस्कार होतात असे आपल्या भाषणात सांगितले. 


शिवाजी शिंदे यांनी मान्यवरांचे स्वागत केले व मनोगत व्यक्त करताना यावर्षी बालरंगभूमी परिषदेची साथ लाभली याचे समाधान व्यक्त केले. सुरेश पवार यांनी सन्मानपत्राचे वाचन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र सावंत व सुजाता डांगे यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता संजय गावडे, दीपक चिपळूणकर,विशाल पितळे, हेमंत यादगिरे, ऐश्वर्या भारगुडे, सुनंदा जाधव, मेघा शृंगारपुरे, सिद्धेश यादगिरे, साकार देसाई, सीताराम शिंदे यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments