कल्याण मध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती उत्साहात साजरी

कल्याण : सावित्रीबाई ज्योतिबा फुले शिक्षण सहाय्यक मंडळ कल्याण या संस्थेच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले यांच्या १९५ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याहस्ते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याला पुष्पाहार अर्पण करण्यात आले. तसेच महात्मा फुले पोलीस स्टेशनचे व.पो.नि. अशोक होनमाने यांनीही महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याला पुष्पाहार अर्पण केले.


      दोन्ही मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी संस्थेचे जेष्ठ विश्वस्थ पी. जी. माळी, उपाध्यक्ष पी. एल. देवरे, माजी अध्यक्ष शरद महाजन, सरचिटणीस सुधाकर महाजन, खजिनदार जे. एस. महाजन, वरिष्ठ विश्वस्त शांताराम माळी, नारायण चौधरी, मधू खैरे, एन. व्ही महाजन, अशोक बोरसे, प्रशांत माळी, योगेश माळी, अनिल कर्पे, संजय पाटील, अतूल माळी, बालूराम जाधव, आदी मान्यवर उपस्थित होते.      सावित्रीबाई महिला मंडळाच्या अध्यक्षा उषा महाजन, निर्मला देवरे, शेवंता माळी, छाया पाटील यांच्यासह इतर मान्यवर महिला व मंडळाचे सभासद, विश्वस्त, समस्त बहुजन समाजाचे फुले अनुयायी, विविध समाजाचे, संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक, महापलिकेचे प्रभाग अधिकारी,  सफाई कर्मचारी यांचे बहुमोल सहकार्य मिळाले.      

Post a Comment

0 Comments