राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीला घरचा आहेर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचा राजीनामा घेण्याची मागणी

■राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष दिलीप रोकडे यांचे शरद पवारांना पत्र शरद पवार यांच्या घरावरील हल्ला प्रकरण


कल्याण : राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे  अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर एसटी कामगारांनी हल्ला केल्याच्या प्रकरणामुळे महाराष्ट्र सरकारच्या गृहखात्याचे अपयश दिसून आले असून गृहखाते सांभाळणार्या गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचा राजीनामा घेण्याची मागणी राष्ट्रवादीचे माजी प्रदेश सचिव तथा कल्याण डोंबिवली जिल्हा उपाध्यक्ष दिलीप रोकडे यांनी शरद पवार यांच्याकडे तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह इतर नेत्यांकडे पत्राद्वारे केली आहे. यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीला घरचाच आहे मिळाला असल्याची चर्चा रंगली आहे.


 अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी प्रक्षोभक भाषण करून शरद पवार यांच्याबाबत अर्वाच्य भाषेचा वापर करून परिवहन मंडळाचे कर्मचारी यांना हल्ला करण्यासाठी प्रवृत्त केले. पाच महिने आंदोलन करून प्रक्षोभक आणि त्रस्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी शरद पवार यांच्या मुंबई येथील सिल्व्हर ओक या निवासस्थावर हल्ला केला. सिल्व्हर ओक या निवासस्थानी या वेळी शरद पवार, त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार व त्यांची नात हेच फक्त त्या ठिकाणी होते. अचानक झालेल्या महाराष्ट्र परिवहन सेवेचे कर्मचारी वर्गाने हल्ला केल्याने त्या ठिकाणी फक्त तीन पोलीस कर्मचारी उपस्थित होते. त्यांनी अडविण्याचा प्रयत्न केला परंतु जास्तीत जास्त महिला व प्रक्षोभक पुरुष यांनी चपला फेकून व जे मिळेल ते फेकून जोरदार हल्ला केल्याने त्या पोलिसांना त्यांना आवरणे कठीण झाले.


या हल्ल्यामुळे शासनाला गृहखाते सांभाळता येत नाही त्यांना या देशाच्या नेत्याच्या घरावरहोणाऱ्या हल्ल्याची कानोकान खबर नाही. जर हे लोक पक्षाच्या अध्यक्षाच्या घराची सुरक्षा करू शकत नाही.तर हे लोक महाराष्ट्रातील जनतेची काय सुरक्षा करणार? असा संदेश देशभरात गेला आहे. भाजपाचे सर्व लोक महाराष्ट्रातील महा आघाडी सरकार अस्थिर करून पडण्याचा प्रयत्न करीत आहेत. असे असतांना गृह मंत्री दिलिप वळसे पाटील हे मंत्री महोदय काय करीत होते. महाराष्ट्रात काय घडते आहे. याची खबर गृह मंत्री म्हणून यांना नव्हती का ? असा दिलीप रोकडे यांनी केला आहे.


शरद पवार यांच्या जीविताचे बरे वाईट झाले असते तर आमच्या सारख्या सामान्य कार्यकर्त्याचे त्याच बरोबर महाराष्ट्राच्या जनतेचे व देशाचे प्रचंड नुकसान झाले असते. त्यामुळे शरद पवार यांच्या घरावर झालेल्या हल्ल्याची जबाबदारी गृहमंत्री दिलिप वळसे पाटील यांनी स्विकारावी व नैतिक जबाबदारी स्विकारून त्यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा. व राजकीय सन्यास घ्यावा अशी मागणी दिलीप रोकडे यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments