जागे व्हा आयुक्त... निषेधात्मक गाण्याद्वारे सामाजिक कार्यकर्त्यांने व्यक्त केला निषेध

५०० व्या दिवशीही अनधिकृत बांधकांमा विरोधात महेश निंबाळकर यांचे आंदोलन

कल्याण , कुणाल  म्हात्रे  : सलग पाचशे दिवस आंदोलन करून देखील अनधिकृत बांधकामावर कारवाई होत नसल्याने आज डोंबिवलीतील सामाजिक कार्यकर्ते महेश निबाळकर यांनी “जागे व्हा आयुक्त’ हे निषेधत्मक गाणं गात आंदोलन केलं आहे. कल्याण डोंबिवली महापालिका मुख्यालयाबाहेर मुनींचा वेष परिधान करत निंबाळकर यांनी गाणं गात सर्वांचे लक्ष वेधून घेतले.  


सामाजिक कार्यकर्ते महेश निंबाळकर हे गेल्या ५०० दिवसांपासून अनधिकृत बांधककामावर कारवाइची मागणी करत आहेत. मात्र अद्यापही कारवाई न झाल्याने आज त्यांनी पालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावार मुनींच्या वेशात आंदोलन केले. या आंदोलनात त्यांनी निषेधात्मक गाणं गायलं या गाण्याद्वारे लोकांचे लक्ष वेधले.


डोंबिवलीतील जैन प्रार्थनास्थळासह इतरही अनधिकृत बांधकामांबाबत आपण पालिका प्रशासनाकडे ५ वर्षांपासून पाठपुरावा करत असून पालिकेकडून कोणतीही ठोस कारवाई न करता केवळ नागरिकांना दाखवण्यासाठी पालिका कारवाई करत आहे. यामुळे झोपेचे सोंग घेतलेल्या आयुक्तांना जागं करण्यासाठी हे आंदोलन केले असल्याची प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते महेश निंबाळकर यांनी दिली.  

Post a Comment

0 Comments