आडीवली-ढोकली मधील बुद्ध विहाराच लोकार्पण

 


कल्याण :  कल्याण पुर्वेतील पंचशील बहुद्देशीय विकास मंडळ यांच्या माध्यमातून सम्राट अशोक बुद्ध विहाराची स्थापना करण्यात आली आहे. आज या बुद्ध विहारात बुद्ध मूर्ती शोभायात्रा व प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झाला. यावेळी भंते सुगतपाल महाथेरो यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. यावेळी कल्याण डोंबिवली महापालिकेचे नगरसेवक कुणाल पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.


       कल्याण पुर्वेतील आडीवली - ढोकली परिसरात बौद्ध विहार नव्हते. त्यामुळे बौद्ध समाजाकडून बौद्ध विहार बांधून देण्याची मागणी करण्यात आली होती. या मागणीनुसार नगरसेवक कुणाल पाटील यांनी स्व खर्चाने वास्तू  उभारून दिली आहे. या बौद्ध विहाराचे लोकार्पण कुणाल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भंते सुगतपाल महाथेरो यांच्या हस्ते मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. यावेळी पंचशील बहुउद्देशिय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर आंबदास हिवाळे यांसह अन्य आंबेडकर अनुयायी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments