भिवंडीत किरीट सोमय्या विरोधात मोर्चा काढून जोडो मारो आंदोलन करीत शिवसैनिकांनी व्यक्त केला संताप

 


भिवंडी दि 7(प्रतिनिधी ) भाजपाचे किरीट सोमय्या यांनी युद्धनौका विकांत चे स्मारक बनविण्यासाठी सर्वसामान्य जनतेकडून रेल्वे स्टेशन बाहेर डब्बे वाजवून जमा केलेले सुमारे 57 ते 58 कोटी रुपये किरीट सोमय्या यांनी राज्यभवनात जमा केले नसल्याचा आरोप शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केले आहेत .त्याबाबत ईडी सीबीआय कडे तक्रार करून ही कारवाई केली जात नसताना दुष्ट हेतूने संजय राऊत यांच्या संपत्ती वर जप्ती कारवाई केली जात आहे .


त्याचा निषेध करण्यासाठी शिवसेना भिवंडी शहरप्रमुख सुभाष माने, महानगर प्रमुख श्याम पाटील आणि  भिवंडी ग्रामीण संपर्क संघटक कुंदन पाटील यांच्या नेतृत्वाखाली भव्य मोर्चा काढून आंदोलन करण्यात आले.स्व धर्मवीर आनंद दोघे चौक येथून उपविभागीय अधिकारी कार्यालया  पर्यंत  शहरप्रमुख सुभाष माने ,महानगरप्रमुख शाम पाटील , तालुका ग्रामीण संपर्क प्रमुख कुंदन पाटील यांच्या नेतृत्वखाली निघालेल्या निषेध मोर्चात  आदिवासी प्रकल्प समिती अध्यक्षा आशाताई मोरे, नगरसेवक अशोक भोसले ,शहर सचिव महेंद्र कुंभारे ,तालुका सचिव जय भगत,
मनोज गगे, मदन भोई, दिलीप नाईक, गोपीनाथ काटेकर, संजय काबुकर, महिला शहर संघटक वैशाली मेस्त्री, महिला तालुका संघटक फशीताई नामदेव पाटील ,पंचायत समिती उपसभापती शिला राखाडे यांसह अनेक शिवसैनिक किरीट सोमय्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत सहभागी झाले.


तर महिला शिवसैनिकांनी किरीट सोमय्या यांच्या फोटोला जोडे मारून आपला संताप व्यक्त केला .त्यानंतर उपविभागीय अधिकारी आपले निवेदन दिले आहे  .

Post a Comment

0 Comments