राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे मानवी मूल्यांना चालना मिळेल - पद्मश्री जितेंद्र सिंग शुंटी

कल्याण :  राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे मानवी मूल्यांना चालना मिळेल, असे प्रतिपादन पद्मश्री जितेंद्र सिंग शुंटी यांनी आर्य गुरुकुल ग्रुप ऑफ स्कूल्स अँड एज्युकेशन टुडे फाउंडेशनने अमृत २०२२  या कार्यक्रमात केले. 


नवीन शैक्षणिक धोरणाच्या परिणामांवर प्रकाश टाकणारा एक मोठा कार्यक्रम कोविड-19 महामारीच्या काळात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या लोकांचीही या कार्यक्रमात सन्मान करण्यात आला. शनिवारी आचार्य प्रल्हाद केशव अत्रे रंगमंदिर, कल्याण येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी विविध विषयावर तज्ञ वक्त्यांनी प्रकाश टाकला.


या कार्यक्रमात अनेक नामवंत सार्वजनिक व्यक्तींना त्यांच्या संबंधित क्षेत्रातील योगदानाबद्दल ‘ETF लाइफटाइम अचिव्हमेंट’ आणि ‘ETF HumanE’ पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाला विशेष अतिथी पद्मश्री पुरस्कार विजेते डॉ. जितेंद्र सिंग शुंटी होते; ज्यांनी विविध  पुरस्कार प्रदान केले.


सिटीलाइफ फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. एमएम पाल सिंग गोल्डी हे या सन्माननीय पुरस्काराचे मानकरी ठरले ; डॉ.विंदा भुस्कुटे,  संचालिका संयुक्त महिला मंडळ; डॉ. ओमन डेव्हिड ट्रिनिटी एज्युकेशन ट्रस्टचे संचालक; . बशीर शेख वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोळसेवाडी, नरेश चंद्र, संचालक बी के बिर्ला कॉलेज,  लाईफ अचीवमेंट अवार्ड पुरस्कार     प्रदान करण्यात आला. 


तर विनिता भुजबळ नर्स, संजय देसले, रुग्णवाहिका चालक; जोतजीत सिंग आपत्ती व्यवस्थापन ,मनीष पाल शहिद भगतसिंग सेवा दल अश्या कोविड योद्धे ज्यांनी निस्वार्थपणे समाजाची सेवा केली याबद्दल ‘ETF HumanE’ ने सन्मानित करण्यात आले.


“आम्ही २ वर्षांनंतर ईटीएफ पुरस्कार सोहळ्यासाठी प्रत्यक्ष भेटत आहोत. महामारीच्या काळात समाजासाठी सकारात्मक योगदान देणाऱ्या आणि अनेकांचे जीव वाचणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा सन्मान करताना खूप आनंद होत आहे. आज आम्ही त्यांना ETF जीवनगौरव पुरस्कार आणि ETF HumanE ने सन्मानित करत असल्याचे एज्युकेशन टुडे फाउंडेशनचे सचिव  भरत मलिक यांनी सांगितले. 


पालक समुदायाला राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या परिणामाची जाणीव करून देण्यासाठी देशाच्या विविध भागांतील तज्ञांसह पॅनेल चर्चा आयोजित करण्यात आली होती.
 "चर्चेमुळे सर्व भाग घेणाऱ्या बदलत्या शैक्षणिक परिस्थितीमध्ये त्यांची भूमिका समजून घेण्यास आणि भविष्यातील पिढ्यांवर त्याचा मोठा प्रभाव पाहण्यास सक्षम केले असल्याची माहिती एज्युकेशन टुडे फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. नीलम मलिक यांनी दिली.


डॉ. नीलम मलिक- संचालिका आर्यग्लोबल, डॉ. रीता सोनवत- संचालिका अँपरसँड आणि डॉ. अमित चंद्र- पॉलिसी फेलो, सेंटर फॉर सिव्हिल सोसायटी हे या कार्यक्रमात आपले विचार मांडणारे तज्ञ वक्ते होते. या वेळीस आर्या ग्लोबल  ग्रुप ऑफ स्कूल्स आणि एज्युकेशन टुडे फाउंडेशन तर्फे विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

Post a Comment

0 Comments