किशोरवयीन मुली, गरोदर, स्तनदा मातांची आरोग्य तपासणी


कल्याण :  किशोरवयीन मुली, बालकेगरोदर,स्तनदा माता यांच्या आरोग्याच्या दुष्टीकोनातुन काळातलाव अंगणवाडीत आरोग्यतपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.  पोषण पंधरवडा उपक्रमाचे औच्यित साधत   एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प कल्याण नागरी बिट क्रं ७ अंगणवाडी केंद्र १६५ काळातलाव येथे आरोग्य शिबीर  राबविण्यात आले.                 आरोग्य शिबिराचे आयोजन एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प कल्याण नागरी  प्रकल्प आधिकारी प्रताप पाटीलमुख्य सेविका अस्मिता मोरे यांच्या मार्गदर्शनुसारकल्याण डोंबिवली  मनपाच्या डाँ.आंबेडकर नागरी आरोग्य केंद्रातील   वैद्यकीय अधिकारी  व त्याच्या  पथकाच्या सौजन्याने  ११ ते १८ वयोगटातील ४० किशोरवयीन मुलीची आरोग्य तपासणी शिबारात करण्यात येत रक्तातील एचबीसी बीसी तपासणी करण्यात आली. तसेच बल्डप्रेशर तपासणी केली.    मुलींना आयर्नच्या गोळ्याचे वाटप करण्यात आले.


 

गरोदर स्तनदा माता व किशोरी मुली यांचे रक्तातील हीमोग्लोबीन, कॅल्शियमव थायराॅईड चे प्रमाण तपाणी करण्यात आली. यात एकुण ३० गरोदर, स्तनदा माताची तपसणी करण्यात आली. तसेच डॉ. सुप्रीया झाल्टे  यांनी कमी वजनाच्या मुलांची आरोग्य तपासणी करून त्यांना औषधे देत  पालकांना बालकांचे वजन कसे वाढवावे या बाबत तसेच किशोरवयीन मुलींना उत्तम आरोग्यासाठी आहाराबाबत मार्गदर्शन केले.याप्रसंगी वैघकीय पथकातील   सरिता आचरेकर,(ए एन् एम्) परिचारिकानिलम गायकवाड,  इंदू शेरामलेअरूणा शेलकांडे करूणा शेलार,निलिम गायकवाड लँबटेक्निशीयन वैदही शिरोडकर  आगंणवाडी सेविका शिल्पा बावकरमंजिरी सकपाळ व त्यांच्या सहकारी उपस्थितीत होत्या.

Post a Comment

0 Comments