एमजी मोटर इंडिया कडून २०२१ च्या चौथ्या तिमाहीच्या तुलनेत २०२२ च्या पहिल्या तिमाही मध्ये ६९ टक्क्यांहून अधिक वाढीची नोंद २०२२ मध्ये ४७२१ युनिट्सची विक्री ~


मुंबई, १ एप्रिल २०२२ : एमजी मोटर इंडियाने २०२१ च्या चौथ्या तिमाहीच्या तुलनेत २०२२ च्या पहिल्या तिमाहीमध्ये ६९ टक्क्यांहून अधिक वाढीची नोंद केली आहे. कारउत्पादक कंपनीने मार्च २०२२ मध्ये ४७२१ युनिट्सची विक्री केली, ज्यावर नवीन कोविड-१९ व्हेरिएण्ट आणि जगभरात सुरू असलेल्या सेमीकंडक्टर चिप तुटवड्याकारणास्तव पुरवठा साखळीवर झालेल्या परिणामांचा मोठा फटका बसला.


एमजी मोटर इंडियाला अॅस्टर, हेक्टर, ग्लॉस्टर व ऑल-न्यू झेडएस ईव्हीसह त्यांच्या उत्पादन पोर्टफोलिओसाठी चौकशी व बुकिंग्जमध्ये सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. कारउत्पादक कंपनी जगभरात सुरू असलेला खंडित पुरवठा पाहता आपले उत्पादन सुरळीत ठेवण्यासोबत वाढवण्याचा प्रयत्न करत आहे.


नुकतेच लाँच करण्यात आलेल्या ऑल-न्यू झेडएस ईव्हीला मार्चमधील १५०० हून अधिक बुकिंग्जसह ग्राहकांकडून प्रबळ प्रतिसाद मिळाला आहे. ऑल-न्यू झेडएस ईव्हीमध्ये विभागातील सर्वात मोठी ५०.३ केडब्ल्यूएच बॅटरीसह प्रगत तंत्रज्ञान आहे. ही वेईकल एका चार्जमध्ये ४६१ किमी प्रमाणित रेंज देते. एमजी ईव्ही परिसंस्था प्रबळ करण्यासोबत भारतामध्ये शाश्‍वत भविष्‍य निर्माण करण्याच्या दृष्टीकोनासह इलेक्ट्रिक मोबिलिटी अवलंबता वाढवण्याच्या दिशेने संघटित पुढाकार घेत आहे.

Post a Comment

0 Comments