मृणाल ठाकूर बनली ऑडिओ ब्रॅण्ड ‘ट्रूक’ची ब्रॅण्ड अॅम्बेसेडर


मुंबई, १४ एप्रिल २०२२ : ट्रूक (truke) या भारतातील उत्तम दर्जाचे वायरलेस स्टिरिओ, वायरलेस हेडफोन्स, साऊंड प्रोफेशनल्ससाठी तसेच संगीत चाहत्यांसाठी इअरफोन्स आणि बीस्पोक ऑकोस्टिक उपकरणे बनवणा-या झपाट्याने विकसित होत असलेल्‍या आघाडीच्या ऑडिओ ब्रॅण्डने त्यांचे ऑफिशियल ब्रॅण्ड अॅम्बेसेडर म्हणून किंवा सर्व टीडब्ल्यूएस उत्पादनांमध्ये दिसण्यासाठी हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीमध्ये तिच्या अभिनयासाठी प्रशंसित आघाडीची सेलिब्रिटी व अभिनेत्री मृणाल ठाकूरची निवड करण्याचे ठरवले आहे. या सहयोगासह ट्रूकचा मृणाल ठाकूरच्या वाढत्या चाहतावर्गाचा लाभ घेत व्यापक ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचा मनसुबा आहे.


या सहयोगाबाबत बोलताना मृणाल ठाकूर म्हणाल्या, "संगीत माझ्या मनाच्या खूप जवळ आहे. माझे कान व आत्‍म्यासाठी ते चिंतनासारखे आहे, जे माझ्यामध्ये ऊर्जा व उत्साहाची भर करते. मला ट्रूकसारख्या ब्रॅण्डसोबत सहयोग करण्याचा आनंद होत आहे. हा ब्रॅण्ड अगदी माझ्यासारखाच स्पर्धात्मक बाजारपेठेत कामगिरी व दर्जानुसार स्वत:चे नाव स्थापित करण्याप्रती काम करत आला आहे. मी माझ्या चाहत्यांना ट्रूकची ओळख करून देण्यास आणि सर्वोत्तमता आणि ग्राहक समाधान संपादित करण्याप्रती काम करणा-या ब्रॅण्डचा शोध घेण्यामध्ये मदत करण्यास उत्सुक आहे."


ट्रूक इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. पंकज उपाध्याय म्हणाले, "स्थापेनपासून आम्ही आमच्या विभागामधील सर्वात पसंतीचा व झपाट्याने विकसित होणारा ऑडिओ ब्रॅण्ड बनत मोठी प्रगती करण्यामध्ये यशस्वी ठरलो आहोत. अधिकाधिक ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी व आमच्या ब्रॅण्डमध्ये नवीन चेहरा म्हणून भर करण्यासाठी आम्ही आमचे ब्रॅण्ड अॅम्बेसेडर मृणालची निवड करण्याचा निर्णय घेतला. 


प्रामाणिकपणे सांगायचे झाले तर आम्ही आमच्यासारखाच समान प्रवास असलेल्या, समर्थक म्हणून मोठ्या प्रमाणात तरूण पिढी असलेल्या आणि आमच्या ब्रॅण्डच्या तत्त्वाशी परिपूर्णरित्या जुळणा-या त्यांच्यापेक्षा सर्वोत्तम सेलिब्रिटीचा विचार करू शकलो नाही. टे‍लि‍व्हिजन ते बॉलिवूडपर्यंतचा त्यांचा प्रवास, तसेच आपली कामगिरी मतांबाबत प्रामाणिक व नीडरवृत्तीने अनेक लोकांना प्रेरित केले आहे. आम्ही या सहयोगाबाबत ति‍तकेच आत्मविश्वासू, उत्साहित व आनंदित आहोत आणि यशस्वी सहयोगासाठी उत्सुक आहोत."

 

अभिनेत्रीच्या चित्रपटसृष्टीमधील वाढत्या उपस्थितीप्रमाणेच ट्रूक देखील विभागामध्ये प्रबळ बाजारपेठ हिस्सा संपादित करण्यामध्ये विकसित झाली आहे. तसेच कंपनीला नुकतेच भारतीय ऑडिओ ग्राहक तंत्रज्ञान बाजारपेठेतील अव्वल ६ ऑडिओ ब्रॅण्ड्समध्ये सूचीबद्ध करण्यात आले.

Post a Comment

0 Comments