कल्याण पश्चिममध्ये देखील गुढीपाडव्याचा उत्साह

 


कल्याण :  कल्याण पश्चिमेत देखील आज गुढीपाडव्याचा उत्साह पाहायला मिळाला. गेल्या दोन वर्षांपासून कोरोना मुळे खंडित झालेली हिंदू नववर्ष अर्थात गुढीपाडव्याची स्वागतयात्रा यंदा अखिल भारतीय  ब्राम्हण महासंघ यांच्या वतीने आयोजित करण्यात आली होती यंदाच्या स्वागत यात्रेत पालखी सोहळा तसेच सुयोग महिला भजनी मंडळस्वरांश ढोल ताशा पथकडॉक्टर पंकज पत्की यांनी वृक्ष संवर्धनाचा संदेश दिला.


यंदाच्या गुढीपाडव्याच्या सोहळ्याची जबाबदारी अखिल भारतीय ब्राम्हण महासंघ कल्याण शहर अध्यक्ष महेश केळकर व सर्व पदाधिकारी यांनी पार पडली. या सोहळ्यास माजी आमदार नरेंद्र पवार, अखिल भारतीय ब्राम्हण महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गोविंदराव कुळकर्णी ठाणे जिल्हा अध्यक्ष शशांक खेरकल्याण संस्कृती मंचाचे कार्यकर्ते मोठ्यासंखेने महिला आणि नागरिक हिंदू नववर्ष स्वागत यात्रेत सहभागी झाले होते.


अत्रे रंगमंदिर, शंकरराव चौक, अहिल्याबाई चौक, टिळक चौक, पारनाका, लाल चौकी या पालखीच्या मार्गावर ठीक ठिकाणी पालखीचे स्वागत करण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने शोभायात्रेत सहभागी झाले होते. पोलिस प्रशासन बाजारपेठ पोलिस स्टेशनचे सर्वतोपरी सहकार्य लाभले असल्याची  माहिती अखिल भारतीय ब्राम्हण युवा आघाडीचे अध्यक्ष सारंग केळकर यांनी दिली.

Post a Comment

0 Comments