केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेतून कल्याण शहरात स्मार्ट रस्त्याचे भूमिपूजन केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन


कल्याण : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून कल्याण-डोंबिवली शहरात राबविण्यात येणाऱ्या स्मार्ट सिटी प्रकल्पातून ६१ कोटी रुपये खर्चून मंगेशी सृष्टी ते रौनक सिटीपर्यंत स्मार्ट रस्ता उभारण्यात येत आहे. या रस्त्याचे केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. या रस्त्यामुळे नवे कल्याण अशी ओळख झालेल्या शहराचा विकास आणखी वेगाने होणार आहे. या रस्त्यासाठी केंद्र सरकारने ३१ कोटी रुपये दिले आहेत. या कार्यक्रमाला खासदार डॉ. श्रीकांत शिंदेआमदार गणपत गायकवाडविश्वनाथ भोईरमाजी आमदार नरेंद्र पवारआयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.


पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी देशातील १०० शहरांमध्ये स्मार्ट सिटी म्हणून कल्याणची निवड केलीहा कल्याणमधील नागरिकांचा सन्मान आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी केंद्र सरकारने आतापर्यंत १९८ कोटी रुपये निधी दिले असूनराज्य सरकारने ९८ व महापालिकेने ९८ कोटी रुपये दिले आहेत. यापुढे आणखी दोन हप्ते केंद्र सरकारकडून येणार आहेत. केंद्रीय नगर विकास मंत्री हरदिपसिंग पुरी यांच्यामार्फत ते लवकरात लवकर मिळण्यासाठी प्रयत्न करेन. स्मार्ट सिटीतून उभारण्यात येत असलेल्या नौदल संग्रहालयासाठी फायटर विमान व तोफेच्या मागणीचा प्रस्ताव पाठवावा. त्यासाठी संरक्षण मंत्रालयाकडे पाठपुरावा करेनअशी ग्वाही राज्यमंत्री कपिल पाटील यांनी दिली.


कल्याण शहराच्या विकासाबरोबरच वेगवान वाहतुकीसाठी भिवंडी ते कल्याण मेट्रो मार्गाचे काम लवकर सुरू करावे. कल्याण शहरातील रस्त्यांच्या कॉंक्रिटीकरणासाठी `एमएमआरडीए'मार्फत आणखी ५० कोटी रुपये द्यावेतअशी मागणीही कपिल पाटील यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली. कल्याण पूर्व व डोंबिवली भागातील रस्त्यांसाठी १५ व्या वित्त आयोगाच्या निधीचा वापर करावा अशा सुचनाही राज्यमंत्री पाटील यांनी आयुक्त सुर्यवंशी यांना दिल्या.

Post a Comment

0 Comments