सावरकर-कारवालो, लोकमान्य नगरात भाजप- शिवसेनेला खिंडार मयूर शिंदेंसह शेकडो शिवसैनिकांचा राष्ट्रवादीत प्रवेश

ठाणे (प्रतिनिधी) - लोकमान्य, सावरकर-करवालो नगरमध्ये भाजप,  शिवसेनेला मोठे खिंडार पडले आहे. भाजपचे पदाधिकारी मयूर शिंदे यांच्यासह त्यांच्या शेकडो भाजप आणि शिवसेनेच्या  कार्यकर्त्या‍ंनी रविवारी गृहनिर्माण मंत्री ना. डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आनंद परांजपे आणि माजी नगरसेवक अमीत सरैय्या उपस्थित होते. 


मयूर शिंदे हे गेल्या अनेक वर्षांपासून भाजपमध्ये कार्यरत होते.त्यांचा सावरकर-करवालो, लोकमान्य  नगरात दांडगा जनसंपर्क आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार आणि गृहनिर्माण मंत्री ना. डॉ. जितेंद्र आव्हाड यांची सर्वसमावेशक कार्यपद्धती कार्यकर्त्यांना उभारी देणारी असल्याने त्यांच्या विचारधारेला अभिप्रेत राहून मयूर शिंदे आणि त्यांच्या शेकडो समर्थकांनी तसेच अनेक शिवसैनिकांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.


 विशेष म्हणजे सुमारे ५० महिलांचाही त्यामध्ये समावेश आहे.  या सर्वांच्या हाती राष्ट्रवादी काँग्रेसचा ध्वज देऊन त्यांना आनंद परांजपे यांनी पक्षात प्रवेश दिला. यावेळी ज्येष्ठ नगरसेवक हणमंत जगदाळे, दिगंबर ठाकूर, मा. परिवहन सदस्य संतोष पाटील, उपस्थित होते. अन्नू आंग्रे, राजा जाधवर, संदीप घोगरे आदी उपस्थित होते.


यावेळी गृहनिर्माण तथा अल्पसंख्यांक मंत्री ना. डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी, सर्वांना परिवर्तनाची अपेक्षा आहे. लोकांची कामे होत आहेत. लोकांना राष्ट्रवादीवर विश्वास आहे. आपले भविष्य कोणाच्या हाती सुरक्षित आहेत, हे युवकांना समजत आहे. त्यामुळेच ते राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करीत आहेत. युवकांची ही ऊर्जा नक्कीच परिवर्तन घडवेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Post a Comment

0 Comments