साठ वर्षीय वुध्देच्या प्रामणिकतेला सलाम दोन लाख किमतीचे सोन्याचे ब्रेसलेट केले परत


कल्याण : कल्याण पश्चिमेत गुरुवारी सकाळी १० च्या सुमारास दोन लाख रु. किमंतीचे तब्बल तीन तोळ्याचे सोन्याचे ब्रेसलेट झाडू सुपे विक्री करून आपली गुजारण करणाऱ्या ६० वर्षीय वुध्देला सापडले असता वाहतूक शाखेच्या पोलिस हवालदाराच्या निर्देशनास आणून देत आपला प्रामणिकपणा दाखविला. वाहतूक पोलिसांनी शाहनिशा करीत ज्याचे सोन्याचे ब्रेसलेट हरविले होते. त्यांचा शोध घेत त्यांना ब्रेस्टलेट परत केल्याची सुखद घटना घडली. 

                       

गुरूवारी सकाळी १० च्या सुमारास महात्मा फुले चौक कल्याण पश्चिम येथे कार चालक संकेत संजय ढेरंगे हे नाश्ता करत असताना त्यांचे हातातील तीन तोळे वजनाचे सोन्याचे ब्रेसलेट किंमत सुमारे दोन लाख रुपये हे खाली पडून गहाळ झाले. ते महात्मा फुले चौकात झाडू सुपडे विक्री करणारी महिला जाहिदा शेख ईसार वय ६० वर्षीय वुध्देस  सापडले. 


त्यांनी आपला प्रामाणिकपणा दाखवून सदर बाब ड्युटीवरील वाहतूक अंमलदार पो. हवालदार विठोबा बगाड, बाळू सावकारे, वार्डन सत्यजित गायकवाड, संतोष घोलप यांना सांगितली. त्या अनुषंगाने पोलीस अंमलदार व वार्डन यांनी सदर कार चालक संकेत ढेरंगे यांचा शोध घेऊन त्यांना त्यांचा किमती ऐवज तीन तोळे वजनाचे सोन्याचे ब्रेसलेट परत केले.


 झाडू विकणारी महिला जाहिदा निसार शेख यांचा प्रामाणिकपणा खरोखरच कौतुकास्पद प्रशंसनीय आहे. त्याबद्दल जहिदा शेख व पोलीस अंमलदार यांचा सत्कार कल्याण वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तरडे यांनी  केला.

Post a Comment

0 Comments