महिला सबली करणासाठी होपमिरर फाउंडेशनचा "प्रोजेक्ट सखी" महिला व्यापार योजने द्वारा महिलांना उपलब्ध झाला रोजगार


कल्याण : महिला सबलीकरणासाठी होपमिरर फाउंडेशनने  "प्रोजेक्ट सखी" हा उपक्रम सुरु केला असून  महिला व्यापार योजनेद्वारा महिलांना रोजगार उपलब्ध झाला आहे.


टीम होपमिरर आदिवासी समाजाच्या विकासाठी आणि सुधारण्यासाठी आदिवासी विकास प्रकल्प सुरू करण्याचा सामाजिक प्रयत्न सुरु केला आहे. होपमिररने खारघर शहराजवळ असलेल्या दोन आदिवासी वाडी घोलवाडी  आणि आंबावाडी यांचे सर्वेक्षण केले. विभागाचे सर्वेक्षण करण्यात आले ज्यामध्ये  व्यवसाय पद्धतीमुलांची शैक्षणिक स्थितीउत्पन्नाचे स्रोत आणि पायाभूत सुविधा पाहिल्या. टीम होपमिरर या आदिवासी गावांची काळजी घेत असल्याने या आदिवासी गावाला आधुनिक गावात बदलण्यासाठी होपमिरर फाउंडेशन  आता काम करत आहे.


सर्वेक्षण मधे दिसून आले की महिला वर्ग बेरोजगार आहे म्हणून यासाठी "प्रोजेक्ट सखी " - महिला व्यापार योजना हा प्रकल्प गेल्या दोन महिन्यांपासून फेब्रुवारीमध्ये चालू केला. ज्यामध्ये अगरबत्ती बनवायची मशीन विकत घेउन महिलांना पूर्ण प्रशिक्षण देण्यात आले. त्यामुळे त्यांना कमावण्याची आणि त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्याची संधी मिळेल.  या महिलांनी बनविलेले उत्पादन बाजारा मध्ये "सखी अगरबत्ती"  नावाने उपलब्ध आहे.  


सध्या आम्ही दोन  आदिवासी गरजू महिलांना रोजगार दिला आहे. पुढे जसजसा प्रतिसाद भेटेल त्यानुसार आम्ही आणखी महिलांना रोजगार देण्याचा प्रयत्न करूअसे होपमिरर फाऊंडेशन संस्थेचे अध्यक्ष  रमझान शेख यांनी बोलताना सांगितले.

Post a Comment

0 Comments