कल्याण : गुढीपाडवा हिंदू नव वर्ष निमित्ताने ओवळी गाव येथील रेल्वे फाटक शेजारी असलेल्या वीटभट्टी मजुरांना, पुरणपोळी, आमरस, स्नेहभोजनाचे व साड्या वाटप कार्यक्रम "मानव सेवा ही ईश्वरसेवा" या ग्रुपतर्फे करण्यात आला.
"मानव सेवा हीच खरी ईश्वरसेवा" आहे या उद्देशाने गुढी पाडवा सण झोपडीत, उन्हातान्हात कष्ट करून पोटाची खळगी भरण्यासाठी अहोरात्र मेहनत करणाऱ्या वीटभट्टीवर काम करणाऱ्या गरीब, गरजू ,बंधू भगिनी. यांच्यासोबत साजरा करून मानवतेचा धर्म जोपासण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आम्ही सर्व करीत आहोत.
आधार एक हात मदतीचा मानवसेवा हीच ईश्वरसेवा आहे, हाच संदेश घेऊन आम्ही सर्व मंडळी सामाजिक बांधिलकी जोपासत आहोत. कारण ईश्वराने दिलेल्या जीवनाचे सार्थक करण्याची हीच खरी संधी आहे असे आर.एस.पी. युनिट ठाणे पालघर रायगडचे कमांडर डॉ. मनिलाल शिंपी यांनी यावेळी बोलताना सांगितले.
स्वामीनारायण ट्रस्ट कल्याण, आर. एस.पी. युनिट ठाणे, स्वराज्य तोरण चॅरिटेबल ट्रस्ट, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ कोकण विभाग, जेजस ईज लाईफ फाउंडेशन उल्हासनगर, ईवा फाउंडेशन कल्याण, कल्याण सामाजिक संस्था, अशा अनेक संस्थांच्या माध्यमातून आम्ही हे उपक्रम महाराष्ट्रभर राबवतो, त्यामध्ये ऊस तोड कामगार, वीट भट्टी कामगार, रोजंदारीवर काम करणारे मजुर, सफाई कर्मचारी, आशा वर्कर अंगणवाडी सेविका, डॉक्टर, पोलीस कर्मचारी वर्ग, यांच्यापर्यंत आम्ही ही मदत पोचवत असतो असे यावेळी स्वराज्य तोरण चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष डॉ. किशोर पाटील यांनी सांगितले.
0 Comments