कुशीवली गावातील आदिवासी बांधवाना नवीन घरे बांधून द्यावीत राष्ट्रवादीचे तहसीलदारांना निवेदन


डोंबिवली ( शंकर जाधव ) अंबरनाथ तालुक्यातील कुशीवली गाव या हाजीमलंग परिसरातील   आदिवासी समाजाच्या जवळपास ९५ घरांना तनिष्क स्टोन क्रशरच्या दगड फोडीच्या स्फोटकामुळे तडा गेला आहेत. प्रमाणापेक्षा जास्त क्षमतेचे स्फोटक तनिष्क स्टोन क्रेशर वापरत असल्यामुळे कुशिवली परिसरातील शासकीय योजनेतील व खाजगी मालकी असलेल्या आदिवासीच्या घरांना तडे गेल्याचा गावकऱ्यांनी आरोप केला आहे.


आदिवासी बांधवाना न्याय मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीने पुढाकर घेतला आहे.याबाबत राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांसह पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार प्रशांती माने यांची भेट घेऊन निवेदन दिले. कुशिवली गावातील आदिवासी बांधवाना नवीन घरे बांधून द्यावीत अशी मागणी राष्ट्रवादीने निवेदनाद्वारे केली आहे.

    

राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी पदाधिकाऱ्यां समवेत कुशीवलीआदिवासी गावातील घरांची पाहणी केलीहोती. त्यानंतर तपासे यांनी आदिवासी बांधवाना घेऊन आदिवासी विकास राज्य मंत्री प्राजक्त तनपुरे आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ भेट यांची भेट घेऊन निवदेनदिले होते.


सोमवारी राष्ट्रवादीचे प्रवक्ते तपासे, अंबरनाथ शहराध्यक्ष सदा मामा पाटील, पदाधिकारी प्रल्हाद पाटील, धर्मा पाटील, रवी पाटील, मधुकर गायकवाड, अंकुश पाटील, तात्या पाटील यांनी तहसीलदर माने यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी तपासे म्हणाले, प्रमाणापेक्षा जास्त क्षमतेचे स्फोटक तनिष्क स्टोन क्रेशर वापरत असल्यामुळे कुशिवली परिसरातील शासकीय योजनेतील व खाजगी मालकी असलेल्या आदिवासीच्या घरांना तडे गेले आहेत.


हि घरे पुन्हा दुरुस्त होण्यासारखी नाहीत. त्यामुळे शासकीय योजनेतील हि घरे पुन्हा नव्याने बांधून द्यावीत अशी आमची मागणी आहेत. स्फोटक तनिष्क स्टोन क्रेशर या गावातीलविहिरीची पातळी खाली गेली आहे. त्यामुळे पाण्यासाठी येथील महिलावर्गाना वणवण करावी लागत आहे. याचा शासनाने विचार केला पाहिजे.

Post a Comment

0 Comments