भिवंडी दि 11(प्रतिनिधी ) थोर समाजसुधारक व स्त्री शिक्षणाचे पुरस्कर्ते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त पालिकेत आज आयोजित केलेल्या कार्यक्रमात सभागृह नेते सुमित पाटील यांच्या हस्ते, पालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या वेळी अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे, मुख्यालय उपायुक्त दीपक पुजारी, कर विभागाचे उपायुक्त दीपक झिंजाड, नगरसेवक विकास निकम, मुख्य लेखा परीक्षक श्रीकांत अनारसे, लेखा वित्त अधिकारी किरण तायडे, प्रशासन विभाग सहायक आयुक्त नितीन पाटील, जनसंपर्क अधिकारी मिलिंद पळसुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष सुरेश मस्के, प्रा. सोमित्र कांबळे, बालाजी कांबळे, बबन घोडके, कामगार नेते महेंद्र कुंभारे, गोकुळ कदम, भानुदास भसाळे, श्रीपत तांबे, राजेश जाधव, गौतम शेलार तसेच अन्य कर्मचारी मोठ्या संख्यने उपस्थित होते.
या वेळी प्रा. सोमित्र कांबळे यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कार्याची माहिती दिली. यानंतर मुख्यालय आवरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास सभागृह नेते सुमित पाटील, आयुक्त सुधाकर देशमुख , डॉ.बाबसाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष सुरेश म्हस्के यांनी पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव कार्यक्रमास सुरवात करण्यात आली. पुढील तीन दिवस शहरात डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव कार्यक्रम शहरात होणार आहेत.
0 Comments