कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयातील अत्याधुनिक लिफ्टचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याहस्ते उद्घाटन करण्यात आले आहे.
कल्याण मधील रुक्मिणीबाई रुग्णालयात रुग्णांसाठी दोन लिफ्ट उपलब्ध आहेत. तथापी सध्याची जुनी लिफ्ट १९९७ साली म्हणजे २५ वर्षापूर्वी बसविण्यात आली होती. परंतू सततच्या वापरामुळे या लिफ्टची झीज झाल्याने त्यांचे आयुष्यमान कमी होत आहे.
त्यामुळे रुग्णालयात येणारे रुग्ण, त्यांचे नातेवाईक, आरोग्य कर्मचारी इ.ची गैरसोय होऊ नये याकरीता एक जुने उद्वाहन बदलून नवीन अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित स्ट्रेचर/पॅसेंजर उद्वाहन, बाई रुक्मिणीबाई रुग्णालयात बसवण्यात आले आहे.
या लिफ्टचे उद्घाटन आज महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आले. हि लिफ्ट गियरलेस, उर्जाकार्यक्षम असल्यामुळे विजेची बचत होणार आहे. सध्यस्थितीत २ पैकी एका लिफ्टचे काम पूर्ण झाले असून लवकर दुस-या लिफ्टच्या कामास सुरुवात करण्यात येईल व ती सर्वांच्या सेवेसाठी उपलब्ध होईल.
यावेळी शहर अभियंता सपना कोळी-देवनपल्ली, वैदयकिय आरोग्य अधिकारी डॉ. अश्विनी पाटील, बाई रुक्मिणीबाई रुग्णालयाचे मुख्य वैदयकिय अधिकारी डॉ. पुरुषोत्तम टिके, महापालिका सचिव संजय जाधव, विदयुत विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत, उप अभियंता जितेंद्र शिंदे, क प्रभागाचे सहा. आयुक्त सुधिर मोकल व इतर अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
0 Comments