लहान नाले, छोटी गटारे नियमित स्वरुपात स्वच्छ करण्याचे महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे निर्देश

कल्याण : कायापालट अभियानांतर्गत महापालिका परिसरातील रस्त्यांची साफसफाई करण्याबरोबरच, येवू घातलेला पावसाळा लक्षात घेता  लहान नाले व छोटी गटारे नियमित स्वरुपात साफ करुन घेणेबाबतचे निर्देश महापालिका आयुक्त  डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सर्व प्रभागांच्या सहा. आयुक्त यांना दिले आहेत. त्याअनुषंगाने आज सकाळपासूनच 1/अ प्रभागाचे सहा. आयुक्त सुहास गुप्ते यांनी  घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या मदतीने  अंतर्गत नाल्यांची साफसफाई करण्यास सुरुवात केली.


त्याचप्रमाणे 3/क प्रभागातही सहा. आयुक्त सुधिर मोकल यांनी कल्याण पश्चिम परिसरात आरोग्य निरिक्षक जगन्नाथ वड्डे व इतरांच्या मदतीने  संतोषी माता रोड - सहजानंद चौक - छत्रपती शिवाजी महाराज चौक - महमंद अली चौक – म. फुले चौक तसेच कल्याण स्टेशन परिसर,गावदेवी रोड, लालचौकी रोड, सुभाष नगर रोड, दुध नाका,राममारूती रोड, निक्की नगर, चौधरी मोहल्ला, आधारवाडी चौक, व मेन रोड परिसरातील साफसफाई करून घेतली आणि जोशीबाग परिसरातील ,पंचमुखी परिसरातील तसेच अन्सारी चौक येथील गटारातील गाळ काढुन साफ करण्याची कारवाई घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या  कर्मचा-यांमार्फत करुन घेतली.


तसेच 4/जे प्रभागात प्रभागाच्या सहा. आयुक्त हेमा मुंबरकर यांनी कल्याण पूर्व परिसरातील  आरोग्य निरीक्षक दिघे व इतर कर्मचा-यांच्या मदतीने मंगल राघोनगर, चिकनीपाडा, जरीमरीनगर,वालधुनी या परिसरातील गटारे साफसफाई करुन गाळ काढण्याची  कारवाई केली.


'5/ड' प्रभागामध्ये सहा. आयुक्त सविता हिले यांनी प्रभागातील आरोग्य निरिक्षक यांच्या अधिपत्याखाली कल्याण पूर्व परिसरातील पुना लिंक रोड व श्रीमलंग रोड, चक्की नाका परिसरातील रस्त्यांची साफसफाई करून संपूर्ण रस्त्याच्या दुर्तफा फुटपाथ व डिव्हायडर, रस्त्यावरील आजूबाजूच्या परिसरात निदर्शनास येणारा कचरा,  रॅबिट, इत्यादी उचलून साफसफाई करुन घेतली. तसेच शास्त्रीनगर  टेकडी, शनिनगर, विजयनगर  इ. परिसरात असलेल्या छोटया गटारांमधील चोकअप काढून गटारे साफसफाई करण्यात आली.

Post a Comment

0 Comments