एनसीपीईडीपी आणि नॅशनल डिसेबिलिटी नेटवर्कद्वारे नॅशनल कन्सल्टेशनचे आयोजन

मुंबई, ११ एप्रिल २०२२ : एनसीपीईडीपीने नॅशनल डिसेबिलिटी नेटवर्क (एनडीएन) सोबत सहयोगाने शालेय शिक्षण, अर्ली चाइल्डहूड केअर अॅण्ड एज्युकेशन (ईसीसीई), शिक्षकांचे शिक्षण व प्रौढ शिक्षण या क्षेत्रामध्ये राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्याच्या विकासासंदर्भात नॅशनल कन्सल्टेशनचे आयोजन केले. या कन्सल्टेशनमध्ये विकलांग व्यक्ती, विकलांग व्यक्तींच्या संस्था, क्षेत्रातील तज्ञ आणि एनसीईआरटीचा देखील सहभाग दिसण्यात आला.


एनसीईआरटीने दिनांक २८ डिसेंबर २०२१ रोजीच्या अधिसूचनेमध्ये शालेय शिक्षण, ईसीसीई, शिक्षकांचे शिक्षण व प्रौढ शिक्षण या क्षेत्रामध्ये राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यावर माहिती देण्याकरिता विविध थीम्सवर पोझिशन पेपर्स विकसित करण्यासाठी नॅशनल फोकस ग्रुप्सची रचना करण्याबाबत अधिसूचित केले. राष्ट्रीय शै‍क्षणिक धोरण (एनईपी) २०२०च्या शिफारशींच्या अनुषंगाने राष्ट्रीय व राज्य पातळीवर पोझिशन पेपर्स विकसित करण्यासाठी २५ थीम्स ओळखण्यात आल्या आहेत. 


पण सार्वजनिक क्षेत्रात उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारावर असे निदर्शनास आले की, तयार करण्यात आलेल्या नॅशनल फोकस ग्रुप्समध्ये विकलांग व्यक्तींचे पुरेसे प्रतिनिधित्व नव्हते. राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा हा भावी पिढ्यांच्या शिक्षणाच्या दर्जावर प्रभाव करणारे माध्यम असल्यामुळे या महत्त्वाच्या विषयावर चर्चा करण्यासाठी नॅशनल कन्सल्टेशनचे आयोजन करण्यात आले.


डॉ. श्रुती मोहपात्रा, सदस्य - नॅशनल फोकस ग्रुप, इनक्लुसिव्ह एज्युकेशन यांनी या कन्सल्टेशनचे अध्यक्षस्थान भूषवले आणि सहभागींना फक्त इनक्लुसिव्ह एज्युकेशन ग्रुपपर्यंत मर्यादित न राहता सर्व २५ फोकस ग्रुप्समध्ये विकलांग व्यक्तींचा समावेश करण्याचे महत्त्व सांगितले.


एनसीपीईडीपीचे कार्यकारी संचालक श्री. अरमान अली म्हणाले, "संपूर्ण विकलांग क्षेत्राच्या सातत्यपूर्ण चिकाटीनंतर ईसीसीईपासून उच्च शिक्षणापर्यंत एनईपी २०२० मध्ये विकलांग मुले/व्यक्तींचा उल्लेख दिसून येतो. एनसीएफ विकलांग क्षेत्राला एकत्र येण्याची आणखी एक संधी देते आणि विकलांगता ही फक्त इनक्लुसिव्ह एज्युकेशनपुरतीच नाही तर सर्व थीम्समधील क्रॉस-कटिंग समस्या आहे या बाबीवर भर देते."

Post a Comment

0 Comments