
कल्याण : कल्याण यार्डातील मालगाडी चालक, सहाय्यक चालक अशा सुमारे १५० रेल्वे कर्मचाऱ्यांनी रेल्वे प्रशासनाने कामाचे तास वाढविल्याने काम बंद आंदोलन करीत कामाच्या वाढीव तास तुघलकी फर्माना विरोधात आपला संताप व्यक्त करीत आहेत. कल्याण रेल्वे यार्डातील सुमारे १५० कर्मचारी संपात सहभागी झाल्याने कल्याण यार्डातुन सुटणार्या सुमारे ७० मालगाडी रेल्वे वाहतूक बुधवार पासून ठप्प झाली आहे.
मालगाडी चालक, सहाययक चालक, गार्डचे कामाचेत तास ८ ते १० तासावरून ४० ते ४५ तास केल्याचे फर्मान काढल्याने मालगाडी रेल्वे वाहतूक करणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड असंतोषाचे वातावरण बनले आहे. कामाचे वाढीव तास तुघलकी फर्मानाच्या बाबतीत आपला रोष असल्याने कल्याण रेल्वे यार्डातील सुमारे १५० कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलनाचा पावित्र्या उचल्याने कल्याण यार्डातील मालगाडी रेल्वे वाहतूक सेवा ठप्प झाली आहे.
पनवेल, वसई, लोणावळा, वडाळा, तुर्भे, इगतपुरी आदि ठिकाणी कल्याणहून मालगाड्या सुटतात. पनवेल यार्डात देखील आंदोलन सुरू असल्याने रेल्वे मालगाडी वाहतूक कोलंमडली आहे. या रेल्वेच्या मालगाडी वाहतूकीवर परिणाम झाल्याने मालगाडीने जीवानाअवश्याक वस्तुच्या पुरवठ्यावर परिणाम होण्याच्या शक्यतेमुळे मालगाडी वाहतुकीत काम करणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्यांच्या काम बंद आंदोलनच्या फटक्यामुळे जीवन आवश्यक वस्तुचे दर वधारण्याची भिती जाणकार यानिमित्ताने व्यक्त करीत आहेत.
0 Comments