अनेक दिवस न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे तडजोडी साठी राष्ट्रीय लोकअदालत चे आयोजन

 


ठाणे , प्रतिनिधी  :-  जिल्हा विधी सेवा प्राधिकरण ठाणे कडून अनेक दिवस प्रलंबित न्यायालयातील तडजोडीस पात्र स्वरूपाची प्रकरणे सोडवण्यासाठी राष्ट्रीय लोक अदालत चे आयोजन 7 मे रोजी करण्यात आले आहे. या लोक अदालत मध्ये दिवाणी स्वरूपाची, तडजोडी पात्र फौजदारी, वैवाहिक, 138 एन आय ऍक्ट, बॅक वसुली, मोटार अपघात नुकसान भरपाई, कौटूंबिक वाद, कामगार विषयक, भूसंपादन प्रकरण, वीज व पाणी विषयक, महसुल इत्यादी ताडजोडीसाठी प्रकरणे ठेवण्यात येणार आहेत. 


           व लोक अदालत मध्ये जे प्रकरण दाखल करण्यासाठी न्यायालयीन मुद्रांक शुल्क भरला जातो तो पूर्ण पणे परत दिला जाणार असल्याचे यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण ठाणे सचिव एम आर देशपांडे हे लोक अदालत साठी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. तर पक्षकारांना प्रकरणे लोक अदालत मध्ये ठेवण्यासाठी न्यायालयात अर्ज करावा असे आवाहन देखील यावेळी पक्षकारांना सचिव देशपांडे यांनी केले आहे...

Post a Comment

0 Comments