कल्याण तहसील कार्यालया समोर आरटीआय कार्यकर्त्यांचे उपोषण गुरचरण जागेवरील अनधिकृत बांधकाम हटविण्याची मागणी


कल्याण : कल्याण ग्रामीण भागातील निळजे परिसरातील सरकारी गुरचरण जागेवर अनधिकृत बांधकाम केल्या प्रकरणी माहिती अधिकाराचे कार्यकर्ते सौरभ सिंह यांनी कल्याण तहसील कार्यालयाकडे तक्रार केली होती. त्यांच्या तक्रारीची दखल घेतली जात नसल्याने सिंग यांनी आजपासून तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरु केले आहे.


निळजे गावातील महेंद्र पाटील यांनी सरकारी गुरचरण जागेवर अनधिकृत बांधकाम केले आहे. हे बांधकाम हटविण्याची मागणी सिंह यांनी तहसीलदारांकडे केली होती. तहसीलदारांकडे या प्रकरणी सिंग हे गेल्या दोन महिन्यापासून पाठपुरा करीत आहे. त्यांच्या तक्रारीची दखल घेतली जात नसल्याने अखेरीस सिंह यांनी तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरु केले आहे. 


जोर्पयत त्यांच्या तक्रारीची दखल घेतली जात नाही. तोर्पयत हे उपोषण सुरुच राहणार असल्याचा इशारा सिह यांनी दिला आहे. यासंदर्भात तहसीलदार जयराज देशमुख यांची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्यासमोर काही निवाडय़ांची सूनावणी सुरु असल्याने त्यांनी प्रतिक्रिया देण्याचे टाळले.


दरम्यान महेंद्र पाटील यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, गावच्या ग्रामसभेने ठराव करुन ही जागा संकल्प बहुउद्देशीय समाजिक संस्थेला दिली आहे. ही जागा संस्थेच्या नावे करण्याच्या सरकारी आणि कायदेशीर प्रक्रिया सुरु आहे. त्यामुळे ही जागा अद्याप संस्थेच्या नावे झालेली नाही. त्यामुळे या जागेवर अनधिकृत बांधकाम केल्याचा तक्रारदाराचा दावा निराधार आहे.

Post a Comment

0 Comments