शहरातील अनधिकृत बांधकामावर ठाणे महापालिकेची धडक कारवाई

■अनधिकृत बांधकामावर करण्यात आलेल्या कारवाईची छायाचित्रे. 

ठाणे :  ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या आदेशान्वये शहरातील अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाईची मोहिम हाती घेण्यात आली असून आज दिवा प्रभाग समितीमधील अनधिकृत बांधकामे जेबीसीच्या साहाय्याने आज जमीनदोस्त करण्यात आली.


      या कारवाईतंर्गत दिवा प्रभाग समिती कार्यक्षेत्रातील समीर हुंडेकर यांचे तळ मजल्याचे दोस्तीच्या मागे असलेले संपूर्ण अनधिकृत बांधकाम जेसीबीच्या साहाय्याने निष्कासित करणेत आले. तसेच शिबालीनगर येथील हिलाल पब्लिक स्कूल मधील तळअधिक पहिल्या मजल्यावरील अनधिकृत बांधकाम व शिबलीनगरमधील प्लिंथ व त्यावरील कॉलम जेसीबीच्या साहाय्याने निष्कासित करण्यात आले.


     सदर निष्कासनाची कारवाई अतिक्रमण नियंत्रण व निष्कासन विभागाचे उप आयुक्त जी.जी. गोदेपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांनी अतिक्रमण विभागाचे कर्मचारी आणि पोलीस यांच्या साहाय्याने केली. दरम्यान यापुढेही संपूर्ण ठाणे महापालिका क्षेत्रात धडक कारवाई सुरूच राहणार असल्याचे अतिक्रमण नियंत्रण व निष्कासन विभागाचे (सनियंत्रण व समन्वय) सहाय्यक आयुक्त श्री.आहेर यांनी सांगितले. 

Post a Comment

0 Comments