भोंगे आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मनसे पदाधिकाऱ्यांना पोलिसांच्या नोटीसा


कल्याण : मशिदीवरील भोंगे हटविण्याच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कल्याण मध्ये मनसे पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी नोटीसा पाठविण्यास सुरवात केली असून ३ तारखेच्या इशाऱ्याच्या  पार्श्वभूमीवर कल्याणमधील मनसे जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर यांच्यासह पदाधिकार्यांना सीआरपीसी १४९ अंतर्गत नोटिस बजाविण्यात आली आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे  यांनी मशिदींवरील भोंगे हटवण्यासाठी तीन मेपर्यंतचा अल्टीमेटम दिला आहे. त्यावरून राज्यातील राजकारण तापलं आहे. कायदा व्यवस्था बिघडू नये म्हणून यासाठी पोलीस यंत्रणेने पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. कल्याण डोंबिवली मधील मनसे जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर यांच्यासह कार्यकर्त्यांना सीआरपीसी १४९  प्रमाणे नोटिसा पाठवल्या आहेत. नोटीस दिल्यानंतर आपण किंवा कार्यकर्त्यानी कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्मान होईल असे कृत्य केल्यास कायदेशीर कारवाई करण्यास येईल असा इशारा पोलिसांनी नोटीसीद्वारे दिला आहे.


तर अशा कितीही नोटीसा आल्या तरी मनसे कार्यकर्ते शांत बसणार नसून अशा नोटिसांना आम्ही घाबरत नाही. पोलिसांच्या नोटीस येणे हे आम्हाला मेडल प्रमाणे असून राज ठाकरे यांचा आदेश हा आम्हाला मोठा आहे. त्यामुळे राज ठाकरे यांचा जो आदेश येईल त्याचे पालन आम्ही करणार असल्याची प्रतिक्रिया मनसे जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर यांनी दिली.

Post a Comment

0 Comments