जबरी चोरी करणा-या अट्टल आरोपींच्या पाठलाग करून मुसक्या आवळण्यात कोनगांव पोलिसांना यश


भिवंडी : दि.04 (प्रतिनिधी )  पहाटे चार वाजता कोनगाव कोनतरी येथे नमाज पठण करण्यासाठी पहाटे चार वाजताच्या सुमारास जात असताना वाटेत धारदार शास्त्राचा धाक दाखवून पळणाऱ्या दोघा सराईत आरोपींना रात्रगस्ती वरील पोलिसांनी पाठलाग करून अटक केली .


युवराज नवनाथ पवार वय 19, रा. सहयाद्री नगर, उल्हासनगर , निशांत राजु होले वय 21,मानेरेगाव, 
उल्हासनगर-4 असे अटक केलेल्या दोघा अट्टल गुन्हेगारांची नावे असून युवराज नवनाथ पवार विरोधात उल्हासनगर,कल्याण, बदलापूर,अंबरनाथ पोलीस ठाण्यात सुध्दा जीवे ठार मारण्याचा प्रयत्न ,चोरी ,लूटमार करण्या बाबतची गुन्हे दाखल आहेत.


 3 एप्रिल पासून पवित्र रमजान महिना सुरू झाल्याने या पहिल्याच दिवशी पहाटे चार वाजता उपवास सुरू करताना नमाज पठण करण्यासाठी फरमान याकुब रैन व त्यांचा मित्र आकीब नजीमुददीन अन्सारी असे दोघे भिवंडी-कल्याण रस्त्यावरून पायी चालत कोनतरी येथे नमाज पठणासाठी जात असतांना कोनगाव येथील सदगुरू किराणा दुकानाचे समोर दुचाकी वरून आलेल्या दोघा इसमांनी अडवून हातातील लोखंडी कोयत्याचा धाक दाखवून जीवे ठार मारण्याची धमकी देत त्यांच्या जवळील 1200 रुपये रोख व 8 हजार किमतीचा मोबाईल हिसकावून घेत कल्याण च्या दिशेने पसार झाले .


त्याच सुमारास त्या परिसरात गस्त घालणारे पोलीस दिसताच या दोघा युवकांनी आरडाओरड केल्याने गस्ती वरील पोउपनि नरेंद्रसिंग गिरासे, सपोउपनि सुर्यवंशी, पोहवा  राजेश शिंदे,पो.ना. गणेश चोरगे,नरेंद्र पाटील, पो.शि. पंडीत राठोड या पथकाने आरोपींचा पाठलाग करीत काही अंतरावर या दोघा आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.त्यांच्या ताब्यातून नंबर नसलेली दुचाकी चाकु चोरीचा मोबाईल असा 49 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे .

Post a Comment

0 Comments