बीम्स फिनटेक फंडाद्वारे २७० कोटी रूपयांच्या पहिल्या फंडाचे समायोजन पूर्ण


मुंबई, ६ एप्रिल २०२२ : बीम्स फिनटेक फंड (बीम्स) या फिनटेकच्या क्षेत्रातील आघाडीच्या सागर अग्रवाल, डॉ. अपूर्वा रंजन शर्मा, अनुज गोलेचा, अनिल जैन, गौरव जैन आणि व्हेंचर कॅटालिस्ट यांनी स्थापन केलेल्या भारतातील पहिल्या ग्रोथ स्टेज फिनटेक फंडने आज आपल्या अधिकृत उद्घाटनापासून तीन महिन्यांमध्ये आपल्या पहिल्या फंडाचे समायोजन पूर्ण केल्याची घोषणा केली.


या संस्थेला फंडासाठी आधीच ३६ दशलक्ष डॉलर्सची वचने प्राप्त झाली आहेत आणि तो दस्तऐवजीकरण पूर्ण करण्याच्या पुढील टप्प्यांमध्ये आहे. बीम्स फायनान्शियल सर्व्हिसेस अँड टेक्नॉलॉजी (फिनटेक) क्षेत्रात काम करणाऱ्या ग्रोथ स्टेज कंपन्यांना पाठिंबा देईल. या फंडाचे ध्येय पुढील नऊ महिन्यांत १०० दशलक्ष डॉलर्सचा लक्ष्य निधी पूर्ण करण्याचे आहे.


या फर्स्ट क्लोजमध्ये बँका, एनबीएफसी, फिनटेक, मोठी कौटुंबिक कार्यालये, वित्तीय सेवांचे सीएक्सओ आणि फिनटेक संस्थापक यांच्यासह मोठे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदार यांचा सहभाग होता.


व्हेंचर कॅटालिस्ट आणि ९ युनिकॉर्न्सच्या विद्यमान गुंतवणूकदारांनी बीम्सला त्यांच्या पहिल्या क्लोजसाठी मदत केली. हा फंड आता विविध देशांतर्गत आणि जागतिक संस्थात्मक गुंतवणूकदार आणि फॅमिलीस ऑफिसेससोबत पुढील चर्चा करत असून त्यातून त्यांचे समायोजन करण्यासाठी आणि १०० दशलक्ष डॉलर्सचा प्रारंभीचा कॉर्पस जमा करण्यासाठी प्रयत्न केले जातील.


बीम्स फिनटेक फंडचे सह-संस्थापक आणि भागीदार सागर अग्रवाल म्हणाले की, “आम्ही आमच्या धोरणावर तसेच भारताचा पहिला ग्रोथ स्टेज लक्ष्याधारित फिनटेक इन्व्हेस्टिंग फंडाची निर्मिती आणि उभारणी करण्यातील क्षमतेवर विश्वास ठेवल्याबद्दल आमच्या गुंतवणूकदारांचे आभारी आहोत. बीम्समध्ये आम्ही एक खास व्यासपीठ तयार करत आहोत, ज्यातून अनुभवी संस्थापक आणि संस्थांना एकत्र आणून आमच्या पोर्टफोलिओ उद्योजकांना धोरण, टीम उभारणी आणि वाढीसाठी मदत आणि आधार दिला जाईल.”

Post a Comment

0 Comments