जयशंकर क्रीडा मंडळ आयोजित कबड्डी सामन्यात जय बजरंग क्रीडा मंडळ विजयी

तर ब गटात जय खंडोबा क्रीडा मंडळ आणि महिला गटात ठाण्याच्या होतकरू क्रीडा मंडळाने मारली बाजी


कल्याण : कल्याण पूर्वेत जयशंकर क्रीडा मंडळ आयोजित कबड्डी सामन्यात अ गटात जय बजरंग क्रीडा मंडळ विजयी तर ब गटात जय खंडोबा क्रीडा मंडळ आणि महिला गटात ठाण्याच्या होतकरू क्रीडा मंडळाने बाजी मारली आहे. या भव्य कब्बड्डी सामन्याला क्रीडा रसिकांचा उत्फुर्त असा प्रतिसाद लाभला.


कल्याण पूर्वेतील दादासाहब गायकवाड क्रीडा पटांगणावर २४ एप्रिल ते २८ एप्रिल २०२२ या दरम्यान सलग ५ दिवस आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत तब्बल २४ महिला संघांसह एकूण ९१ संघांनी सहभाग घेतला होता. या सामन्या दरम्यान संपुर्ण महाराष्ट्रातील  नामांकीत छत्रपती पुरस्कार विजेतेअर्जुन पुरस्कार विजेते तसेच प्रो कबडडी स्टार कबड्डी खेळाडूंनी सामना स्थळी भेट देऊन कबड्डी रसिकांचा आनंद द्विगुणीत केला. या सामन्यातील अ गटाचे अंतिम विजेते पद जय बजरंग क्रीडा मंडळ वासींद या मंडळाने पटकावले तर उपविजेता छत्रपती क्रीडा मंडळ डोंबिवली हे ठरले.  ब गटात जय खंडोबा क्रीडा मंडळाने अंतिम विजेता पद पटकावले तर या गटात  घुंदरच्या संघला उपविजेता पद मिळाले .


या सामन्यातील अंतिम विजय संघांना अनुक्रमे २५ हजार (अ गट)तसेच २० हजार (ब गट) रोख रक्कम व आकर्षक चषक देऊन सन्मानित करण्यात आले. ठाण्याच्या  होतकरू कबड्डी संघ या महिलांच्या कबड्डी संघाने जेते पद पटकावले तर ठाण्याच्याच शिवतेज संघाला उप विजेता पदावर समाधान मानावे लागले. 


या सामन्यातील विजेत्या संघांना माजी आमदार जगन्नाथ शिंदेपोलिस उपायुक्त सचिन गुंजाळ व.पो.नि. अशोक पवारठामपा उपायुक्त मीनल पालांडे, महिला आघाडीच्या विजया पोटे तसेच मंडळाचे उपाध्यक्ष शरद पाटीलमाजी नगरसेवक निलेश शिंदेहेमंत चौधरी आदी मान्यवरांच्या हस्ते पारितोषीके देउन गौरविण्यात आले.

यावेळी ठाणे जिल्हा कबड्डी एसोसिएशचे आजीव अध्यक्ष नित्य हरी डे, पालिकेच्या सहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर, सविता हिले, युवा सेना सचिव धनराज पाटीलयुवती अधिकारी तेजस्वी पाटील यांच्यासह सुंगधा पाटील, रेखा पाटील, डॉ. हरिष धाररावतानाजी शिंदेमाजी नगरसेवक अभिमन्यु गायकवाडमनोज राय आदी मान्यवर उपस्थित होते. या सामन्या दरम्यान संपूर्ण कल्याण डोंबिवली परिसरातील आजी माजी नगरसेवकांसह विविध क्षेत्रातीत प्रतिष्ठीत व्यक्ती तसेच संस्था, संघटनांच्या प्रतिनिधींनी सदिच्छा भेट देऊन सामन्याच्या आयोजना बद्ल आयोजकांचे कौतुक केले. 


या सामन्यात भारतीय संघातील खेळाडू गिरीश इरनक याचा विशेष सत्कार ठेवण्यात आला होता हा सत्कार त्याच्या पत्नीने स्वीकारला. तर ठाणे पोलीस आणि ठाणे महानगरपालिका या दोन संघात प्रेक्षणीय सामना खेळविण्यात आला. यात ठाणे महानगरपालिकेचा विजय झाला.   

Post a Comment

0 Comments