श्वासात अडथळा वाटत असल्यास त्याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज


मुंबई, ७ एप्रिल २०२२ : जिने चढत असताना, व्यायाम करत असताना, आजारी असताना किंवा काळजीत असताना धाप लागणे ही सामान्य गोष्ट आहे. श्वास कमी पडण्याचे कारण काहीही असले तरी तुमच्या छातीत घट्ट झाल्यासारखे वाटणे किंवा नीट श्वास घेता न येणे हे खूप त्रासदायक ठरू शकते. खूप गंभीर नसलेल्या श्वसनाच्या समस्या तुम्हाला जाणवत असल्यास त्या प्रत्येक वेळी काळजीचे कारण असतातच असे नाही.


परंतु तुम्हाला काहीही कारण नसताना श्वसन अचानक बदलल्यास किंवा टप्प्याटप्प्याने ते वाईट होत असल्यास, आणि विशेषतः तुम्ही याचा अनुभव आधी घेतलेला नसल्यास हे एखाद्या आजाराचे चिन्ह असू शकते आणि त्याकडे गांभीर्याने पाहण्याचा सल्ला राम मंगल हार्ट फाउंडेशनचे कार्डिओथोरॅसिक सर्जन डॉ. रणजीत जगताप यांनी दिला आहे. 


श्वास कमी पडण्याची संभाव्य कारणे:


तुम्हाला पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही आणि तुम्हाला श्वास घेण्यासाठी आणखी कठीण परिश्रम करावे लागत असल्याचे वाटते तेव्हा श्वास कमी पडल्याची भावना निर्माण होते. हे दीर्घकाळ कायम राहिल्यास त्यामुळे तुमच्या अवयवांचा ऑक्सिजनचा पुरवठा थांबू शकतो. त्यामुळे शरीरावर गंभीर प्रभाव पडू शकतो. त्यामुळे श्वासाच्या अडथळ्यांमधील प्रमुख कारण हे श्वसनाचे आजार जसे दमा किंवा क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मनरी डिसीज (सीओपीडी) असू शकतात, जे श्वासाच्या मार्गिकांवर प्रभाव टाकू शकतात.


श्वास कोंडल्यासारखे वाटण्याचे आणखी एक कारण अ‍ॅलर्जी आहे. त्याची अनेक कारणेही असू शकतात. जसे, जास्त प्रदूषण, धूळ, परागकण यांच्या संपर्कात येणे. त्यामुळे तुम्हाला श्वास बंद पडल्याचे आणि खोकला आल्याचे वाटू शकते. हे अ‍ॅलर्जी निर्माण करणारे घटक तुमच्या फुफ्फुसांतील श्वसनमार्ग बंद करतात आणि त्यामुळे श्वसनात अडथळे निर्माण होऊ शकतात. कार्डिओव्हॅस्क्युलर आजार असलेल्या किंवा एखाद्या व्यक्तीचे हृदय बंद पडल्यास श्वास कोंडल्याची समस्या दिसून येऊ शकते. ही समस्या मधुमेह, उच्च रक्तदाब किंवा आर्ट्रियल फिब्रिलेशन असलेल्या व्यक्तींमध्ये जास्त दिसण्याची शक्यता असते.


तुम्हाला कधी-कधी अतिचिंतेमुळे श्वास रोखल्याची समस्या भेडसावू शकते. त्यामुळे तुमच्या श्वसनाचा वेग वाढतो. तुम्ही खूप वेगाने श्वासोच्छ्वास करता तेव्हा तुम्ही खूप जास्त ऑक्सिजन शरीरात घेता आणि खूप जास्त कार्बन डाय ऑक्साइड बाहेर सोडता. त्याचा परिणाम म्हणून तुमच्या शरीराला पुरेसा ऑक्सिजन मिळत नसल्याची भावना निर्माण होते.


या समस्येकडे गांभीर्याने पाहण्याचा सल्ला:

डॉ. रणजीत जगताप सांगतात की तुम्हाला तुमचे शरीर अधिक चांगल्या प्रकारे कळते. तुम्हाला अचानक श्वास कोंडल्याची भावना निर्माण झाल्यास आणि अशा प्रकारची भावना यापूर्वी कधीही झालेली नसल्यास किंवा तुम्हाला जाणवत असलेली लक्षणे तुमच्या रोजच्या आयुष्यात हस्तक्षेप करत असल्यास हा काळजीचा विषय आहे. 


तुम्हाला छातीत दुखणे किंवा त्रास जाणवल्यास, व्यायाम करताना गळून गेल्यासारखे वाटल्यास किंवा श्वसनाच्या त्रासामुळे रात्रीच्या वेळी तुम्ही जागे राहत असल्यास काहीतरी चुकीचे आहे याची ही लक्षणे आहेत. तुम्ही तात्काळ वैद्यकीय मदत घेतली पाहिजे. नियंत्रण करण्यायोग्य समस्या हाताळणे योग्य आहे. त्यामुळे तुम्हाला जितक्या लवकर हा त्रास कळेल तितक्या लवकर गंभीर किंवा अतिगंभीर नुकसान होण्यापूर्वी तुम्ही त्यात हस्तक्षेप करू शकता.


श्वसन जगण्यासाठी अत्यावश्यक असलेली बाब आहे आणि कोविड-१९ ने हे आपल्याला सिद्ध केले आहे. प्रत्येकजण आयुष्यात कधी ना कधी श्वास घेण्यासाठी तडफडतो परंतु त्याला गृहित धरू नका. त्यामुळे तुमच्या आजाराचे काहीही कारण असले तरी ही गोष्ट लक्षात ठेवा की योग्य निदान आणि उपचार घेण्यासाठी डॉक्टरांना भेटणे हे पहिले पाऊल आहे..

Post a Comment

0 Comments