कल्याण : श्री राम नवमी उत्सव निमित्त विश्व हिंदू परिषद, बजरंग दल तर्फे मोहने प्रखंड तर्फे चित्र रंग भरण स्पर्धेचे आयोजन जैन हॉल ,मोहने येथे आयोजन केले होते. चित्र रंग भरण स्पर्धचे आयोजन प्रखंड मंत्री निखिल जाधव, सहमंत्री प्रल्हाद वाळुंज, रोहन जगताप, सचिन काटकर, प्रतिक हवळे, संदीप पवार, सतीश रोडे, ओमकार हसे, सागर कारंडे, साहिल शिंगोटे, सौरभ शिंदे आदी कार्यकर्त्यांनी केले होते.
तीन गटात, संपन्न झालेल्या चित्र रंग भरण स्पर्धेत २७५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. चित्र रंग भरण स्पर्धेचे प्रमुख अतिथी धर्म प्रसार प्रमुख कल्याण जिल्हा ॲड. रोशन जगताप, बजरंग दल संयोजक संतोष ढगे, विश्व हिंदू परिषद उपाध्यक्ष ॲड. सुधा जोशी
यांनी उपस्थिती दर्शवीत स्पर्धेत भाग घेतलेल्या विघार्थीचे मनोबल वाढविले.
विद्यार्थ्यामधील सुप्त कला गुणांना वाव देत त्यांना हुरूप मिळण्यासाठी अशा स्पर्धांचे आयोजन होणे गरजेचे आहे. मोबाईलच्या अति वापरा पासून परावृत्त होण्यासाठी मुलांना स्पर्धेत उतरवित त्यांचातील कलागुण ओळखत त्यांना प्रोत्साहन देणे ही काळाची गरज असल्याचे अँड. रोशन जगताप यांनी याप्रसंगी सांगितले.
0 Comments