भिवंडीत वैद्यकीय अधिकारी कारभारी खरात यांचा महानगरपालिके तर्फे सन्मान, महापौर यांचे देखील महासभेत अभिनंदन...


भिवंडी दि 28 (प्रतिनिधी) शहरातील  वैद्यकीय अधिकारी डॉ.कारभारी खरात यांनी कोरोनाच्या काळात पालिकेतर्फे  शहरात अतिशय चांगल्या पद्धतीने काम केले, शासनाकडून कोरोना बाबत आलेल्या सर्व नियम, व मार्गदर्शन कोरोना  हॉस्पिटल सुरू करणे सर्व वैद्यकीय सेवा चांगल्या सुरू ठेवल्या आहेत यासर्व गोष्टींची दखल घेत , तसेच कारभारी खरात यांची पालिकेतून बदली झाली व शासन सेवेत परत रुजू झाल्याने  महानगरपालिकेच्या वतीने  आज झालेल्या महासभेत वैद्यकीय अधिकारी डॉ.कारभारी खरात यांचा  महापौर प्रतिभा विलास पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 


तसेच कोरॉना काळात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल महापौर प्रतिभा विलास पाटील यांना प्रतिष्ठेचा अहिल्यादेवी होळकर पुरस्कार मिळाल्या बद्दल सभागृहात महापौर प्रतिभा पाटील यांचा सर्व उपस्थित सदस्य यांच्याकडून विशेष गौरव करण्यात आला. यावेळी सभागृहात अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे,  उपमहापौर इम्रान वली मोह खान , व्यासपीठावर उपस्थित होते.


यावेळी सभागृहात  तर सभागृहात झालेल्या  चर्चेत सभागृह नेते सुमित  पाटील, स्थायी समिती सभापती संजय म्हात्रे, कोणार्क विकास आघाडीचे गटनेते विलास आर.पाटील, प्रभाग  समिती क्रमांक 2 चे सभापती प्रशांत लाड नगरसेवक मदन नाईक, संतोष शेट्टी, विकास निकम, रिशिका राका,सायली शेटे, साखराबई बगाडे इत्यादी  सदस्यांनी  महापौर प्रतिभा पाटील व वैद्यकीय अधिकारी खरात यांच्या विषयी मनोगत व्यक्त केली. 


कोरोनाच्या  काळात शहराच्या महापौर प्रतिभा पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली पालिकेच्या  सर्व विभागात चांगले  काम करण्यात आले, गरिबांना अन्न पाकीट वाटप करण्यात आली,  अन्य मदत  करण्यात आली, तसेच शासनाकडून आलेल्या सर्व नियम, व मार्गदर्शन सूचना याचे तंतोतंत पालन केले, करून विविध ठिकाणी लसीकरण केंद्र सुरू केली, कोरोना  हॉस्पिटल सुरू करणे, सर्वत्र लसीकरण व्यवस्था, सर्व वैद्यकीय सेवा चांगल्या सुरू ठेवल्या आहेत यासर्व कामांची  दखल घेत महापौर प्रतिभा विलास पाटील व डॉ. खरात यांचा राज्यपाल भगतसिंग कोषारी यांचे हस्ते यापूर्वी सत्कार करण्यात आला. 


याची सभागृहाने विशेष दखल घेत  बुधवारी  झालेल्या महासभेत महापौर प्रतिभा पाटील यांना मिळालेल्या अहिल्यादेवी होळकर पुरस्कार , डॉ. कारभारी खरात यांचा निरोप समारंभ निमित्ताने खरात यांचा सन्मानचिन्ह , शाल देऊन सत्कार  करण्यात आला.

Post a Comment

0 Comments