टाळेबंदीत तरुणपिढी वाचनाकडे वळली पै फ्रेंड्स लायब्ररीचा ३६ वर्षांचा प्रवास

डोंबिवली ( शंकर जाधव ) डोंबिवलीत १३६ लायब्ररी वाचकांसाठी सुरु होत्या.मात्र बदलत्या काळात आता फक्त एकच पै फ्रेंड्स लायब्ररी वाचकांच्या सेवेसाठी उपलब्ध आहे.या लायब्ररितील मुंबई, पुणे इतकेच नव्हे तर अमेरिका, ऑस्ट्रेलिया, सिंगापूर आणि स्पेनपर्यत पुस्तकांचा प्रवास उल्लेखनीय आहे.२०२० पासून ते २०२२ या दोन वर्षाच्या काळात टाळेबंदीत टीव्ही, मोबाईलमध्ये गुंतले असतानाहि विशेष म्हणजे तरुणपिढी वाचनाकडे वळली. पै फ्रेंड्स लायब्ररीचा ३६ वर्षांचा प्रवास पुंडलीक पै यांनी पत्रकारांसमोर उलघडला. डोंबिवली पत्रकार संघाच्या वतीने पै फ्रेंड्स लायब्ररीबरोबर वार्तालाप आयोजित करण्यात आला आहे.

  


पै फ्रेंड्स लायब्ररीमध्ये डोंबिवली पत्रकार संघाने आयोजित केलेल्या वार्तालापमध्ये पुंडलीक पै, भूषण पत्की आणि सुरेखा पुरोहित यांनी पै फ्रेंड्स लायब्ररी यांनी माहिती दिली. पै फ्रेंड्स लायब्ररीच्या सुरुवातीपासून ते टाळेबंदीपर्यतचा प्रवास सविस्तरपणे सांगतना पुंडलीक पै म्हणाले, लायब्ररीच्या ६ शाखा असून २५ हजाराहून जास्त पुस्तके, ग्रंथ, मासिक, नियतकालिका वाचकांसाठी उपलब्ध आहेत.ऑनलाईन पद्धतीने वाचकांना पुस्तकांचा लाभ देण्याचा उपक्रम सुरु आहे. पुस्तक आदान-प्रदान आणि प्रदर्शन २०१७ साली हि आगळीवेगळी कल्पना अंमलात आणताना ७०हजार पुस्तके जमली. 


तर यात सुमारे १० हजार वाचकांनी यात सहभाग घेतला घेतला.२५ हजार पुस्तके , इंग्रजी, मराठी,हिंदी, गुजराथी, कन्नड, तामिळ आणि मल्याळम भाषेतील विविध मासिकांचे संकलन, पुस्तकांची घरपोच सेवा, विविध पुस्तकांचे अद्यावत विक्री दालन, २४/७ सेवा देणारे दोन वाचन सभागृह हे पै फ्रेंड्स लायब्ररीची खास वैशिष्ट आहेत. १ जानेवारी २०१५ रोजी एका दिवसात १०२१ नवीन सभासद नोंदणी झालेली पै फ्रेंड्स लायब्ररी ही जगातील एकमेव लायब्ररी असल्याचा दावा पुंडलीक पै यांनी यांनी वार्तालापात केला आहे.

 

`फ्रेडस कट्टा` हा पै फ्रेंड्स लायब्ररीची आणखी एक वैशिष्ट आहे. २००८ साली लायब्ररी ही ऑनलाईन सेवासुरु केल्यानंतर पुस्तकसेवा पुरविली जाते. पै फ्रेंड्स लायब्ररीचे साहित्यिक, कलावंत, खेळाडूच नव्हे तर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही कौतुक केले.नुकतेच डोंबिवलीत माजी मुख्यमंत्री फडणवीस यांनी पै फ्रेंड्स लायब्ररीला भेट घेतली असता `चांदोबा`पाहून खुश झाले.वाचन संस्कृती जपण्यासाठी पुंडलिक पै यांच्या या प्रयत्नाबाबत कौतुकहि केले.आपल्याकडीलहि काही पुस्तके आपल्या लायब्ररी देऊ असे आश्वासन दिले. 


`मी वनवासी` हे पुस्तक वाचण्यासाठी सिंगापूर येथून एका वाचकाचा फोन आला असता त्यांना त्यांना पुस्तक देण्यात आल्याचे पुंडलिक पै यांनी आवर्जून सांगितले. वार्तालापात प्रास्ताविक पत्रकार शंकर जाधव यांनी आभार प्रदर्शनाची जबाबदारी ज्येष्ठ पत्रकार बजरंग वाळूंज यांनी सांभाळली.

Post a Comment

0 Comments