ग्रामीण भागात आज ही जपली जात आहे बोहाडा संस्कृती

 


भिवंडी :दि.04 (प्रतिनिधी )  चैत्र पाडवा झाला की ग्रामीण भागात ग्राम दैवत यांच्या जत्रा उत्सवांना सुरवात होत असते .पारंपारीक पद्धतीने पालखी सोहळ्या सोबतच  देवदेवतांचे सोंगे नाचवून बोहाडा उत्सव साजरा केला जातो.भिवंडी तालुक्यातील पंचक्रोशीतील शेकडो गावांची बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पडघा या गावात परंपरे प्रमाणे बोहाडा साजरा करण्यात आला .या निमित्त आयोजित जत्रेत हजारोंच्या संख्येने स्त्री पुरुषांनी हजेरी लावली.          जगदीश गायकवाड यांच्या पुढाकाराने ग्रामस्थ मंडळ पडघा वतीने आयोजित या बोहाडा यात्रेत असंख्य ग्रामस्थ मोठ्या उत्साहात सहभागी होत रात्रभर निरनिराळ्या देवदेवतांची मुखवटे लावून वाजत गाजत मिरवणूक काढल्या जातात .पडघा शहरातील बाजारपेठे त असलेल्या कान्होबा मंदिर येथे सुरवातीला पूजा अर्चना होऊन कार्यक्रमास सुरवात होते व त्यानंतर सुरवातीला गाववरील रोगराईचे संकट दूर होण्यासाठी निंबाडा चे सोंग काढले जाते .


आयुर्वेदा मध्ये लिंबाच्या झाडाला महत्वाचे स्थान असताना युवक अंगावर लिंबाच्या झाडाच्या पाने बांधून नाचत देवळा पर्यंत जातात. व त्यानंतर गणपती ,सरस्वती,शंकर,खंडोबा ,भैरोबा, नरसिंह ,त्राटीका राक्षस ,गावदेवी अशी सोंगे संपूर्ण रात्रभर नाचत कान्होबा देवळा पर्यंत जातात.सुरवात गणपती सोंगाने तर  शेवट पहाटे सूर्योदय वेळी गावदेवी व सूर्यदेव यांच्या सोंगाने सांगता होते.


पडघा येथील तुळशीराम गंगाराम गायकवाड यांनी ही परंपरा कित्येक वर्षे टिकवून ठेवली होती. त्यांच्या मृत्यू पश्चात त्यांचे सुपुत्र जगदीश गायकवाड यांनी ही परंपरा सुरू ठेवली आहे .वाडवडिलांनी सुरू करून दिलेली परंपरा ही गावाच्या उत्कर्षासाठी भल्यासाठी आपण सुरू ठेवली असून यामध्ये सर्व ग्रामस्थ यांची साथ मिळते अशी प्रतिक्रिया जगफिश गायकवाड यांनी देत पूर्वी सोंग भाड्याने आणावी लागत होती परंतु मी स्वतः जव्हार येथून ही नवी सोंगे बनवून घेतल्याने ती लावून सोंग नाचविण्यासाठी युवकांमध्ये उत्साह दिसून येतो असे शेवटी जगदीश गायकवाड यांनी स्पष्ट केले.


मागील दोन वर्षे कोरोना मुळे सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी असतानाही पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने कोणताही उत्सव साजरा न करता सोंग नाचवीण्यात आली होती परंतु यंदा निर्बंध शिथिल झाल्याने या उत्सवात हजारी आबालवृद्ध स्त्रीपुरुष सहभागी झाले होते तर पडघा पोलिसांनी या प्रसंगी चोख बंदोबस्त ठेवला होता .

Post a Comment

0 Comments