श्रीराम नवमी निमित्त कल्याणात भाजपतर्फे भव्य शोभायात्रा

 


कल्याण ( शंकर जाधव )  भाजपच्या वतीने श्रीराम नवमीदिनी भाजपाच्या वतीने कल्याणात शोभायात्रा काढण्यात आली होती.प्रभू श्रीराम , सीतामाई, लक्ष्मण आणि हनुमान यांच्या भव्य प्रतिकृती तसेच लहान मुलांनी श्रीरामाच्या, हनुमंताचा वेष परिधान केला होता.


शोभा यात्रेत कल्याण जिल्हा भाजप, माजी आमदार नरेंद्र पवार आणि विकी, सौरभ गणात्रा बंधूंच्या संयुक्त विद्यामने कल्याणात प्रथमच या शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. कल्याण पश्चिमेच्या सुंदर नगर येथून ही शोभायात्रा सुरू होऊन आग्रा रोड, बेतुरकर पाडा, श्रीराम मंदिर, सहजानंद चौक, संतोषी माता रोडमार्गे यशवंराव चव्हाण क्रीडांगण येथे समाप्त झाली.
 

माजी आमदार नरेंद्र पवार, भाजप शहराध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे, वरुण पाटील यांच्यासह भाजपचे असंख्य पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने यामध्ये सहभागी झाले होते. जय श्रीराम आणि बजरंग बली की जयच्या घोषणांनी शोभायात्रेचा मार्ग दणाणून गेल्याचे यावेळी पाहायला मिळाले.

Post a Comment

0 Comments