भोंग्यावरील राजकारणाला सर्वधर्मीय इफ्तार पार्टी हा कार्यक्रमच उत्तर - रझा मुराद

■आरपीआयच्या  इफ्तार पार्टीत सर्व धर्मीय नागरिकांनी घेतला सहभाग

कल्याण  : भोंग्यावरील राजकारणाला सर्वधर्मीय इफ्तार पार्टी हा कार्यक्रमच उत्तर  असल्याची जेष्ठ सिनेअभिनेते रझा मुराद यांनी व्यक्त केली. कल्याण पूर्वेत सूचक नाका येथे आरपीआयचे जिल्हा कार्यध्यक्ष  भारत सोनवणे यांच्या तर्फे सर्वधर्मीय  इफ्तार पार्टीच आयोजन करण्यात आले होते. यावेळी रझा मुराद बोलत होते.


या इफ्तार पार्टी मध्ये मुस्लिम बांधवांसह, हिंदू ,बौद्ध इतर समाजाच्या लोकांनी देखील सहभाग घेतला होता. सिने अभिनेता रजा मुराद ,अली खान यांनी या इफ्तार पार्टीत उपस्थित राहून उपवास सोडला. कल्याण चे डीसीपी सचिन गुंजाळ देखील या कार्यक्रमात उपस्थित होते. यावेळी सध्या सुरू असलेल्या भोंग्यावरील राजकारणाबाबत बोलताना रजा मुराद यांनी सध्या जे राजकारण सुरू आहे त्याला आजच्या सारखे कार्यक्रमच उत्तर आहेत. 


या कार्यक्रमाच आयोजन नॉन मुस्लिम बांधवानी केलं मुस्लिम बांधवांसह इतर समाजातील बांधवाणी सहभाग घेतला, असे कार्यक्रम सुरू राहिले पाहिजेत. आम्ही दिवाळी होळी साजरी करू तुम्ही इफ्तारीच आयोजन करा हे राष्ट्रीय ऐक्य आहे असं बोलताना भोंग्यावरील राजकारणाला आपल्या शायरीच्या अंदाजात उत्तर दिलं.


ए काश अपने मुल्क मे ऐसी फिजा बने मंदिर जले तो रंज मुसलमान को भी हो, पामाल होने पाये ना मस्जिद की आबरू ये ,फिक्र मंदिरों के नीगह्बान को भी हो.


दरम्यान समाजात असलेला एकोपा टिकून रहावा, सध्या जे राजकारण सुरू आहे त्याला चपराक बसावी म्हणून सर्वधर्मीय इफ्तार पार्टीचे आयोजन केलं असल्याची माहिती आयोजक भारत सोनवणे यांनी दिली. तसेच भोंग्याच्या बाबतीत आरपीआय आणि बौद्ध समाज मुस्लिम समाजाच्या पाठीशी उभा असून  वेळ पडली तर प्रत्येक मशिदीसमोर बौद्ध बांधव उभं राहून सुरक्षा देतील अशी प्रतिक्रिया देखील भारत सोनावणे यांनी दिली.

Post a Comment

0 Comments