डोंबिवलीत युवा सेनेचे केंद्र सरकार विरोधात थाळी बजाव आंदोलनडोंबिवली ( शंकर जाधव )  इंधन दरवाढ व महागाई वाढत असल्याने केंद्र सरकार विरोधात युवा सेनेने रविवारी डोंबिवलीतील बाजीप्रभू चौकात थाळी बजाव आंदोलन केले.
आंदोलनात युवासेना, शिवसेना, युवतीसेना, महिला आघाडी पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. आंदोलनकर्त्यांनी थाळी वाजवून  केंद्र सरकारचा निषेध केला. वाचा थंड बसा, पेट्रोल डिझेल १०० के पार...हेच का अच्छे दिन मोदी सरकार?, बहुत हो गई महंगाई की मार...होश मे आओ मोदी सरकार, ना नीती, ना मेल...बस मेहंगा पेट्रोल डिझेल!, देश संभाले संता-बंता...बेहाल होगई सारी जनता  अशा घोषणा देण्यात आले.


 युवासेना जिल्हा अधिकारी दिपेश म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली सदर आंदोलनात शिवसेना उपजिल्हा प्रमुख राजेश कदम, शिवसेना शहर प्रमुख राजेश मोरे, युवासेना डोंबिवली शहर अधिकारी सागर जेधे, युवासेना जिल्हा सचिव राहुल म्हात्रे, युवासेना उपजिल्हा अधिकारी आशु सिंह, युवासेना डोंबिवली विधानसभा अधिकारी सागर दुबे, प्रतिक राणे, युवतीसेना कल्याण लोकसभा अधिकारी लिना शिर्के, जिल्हा समन्वयक पुर्विका म्हात्रे, जिल्हा समन्वयक वैशाली मोंडकर,महिला आघाडी उपशहर संघटक शिल्पा मोरे व सर्व शिवसैनिक आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments