जलतरण पटू सानिया शेखला पुढील सरावासाठी आर्थिक मदत करण्याची मनसेची मागणी

■मनसे शहर संघटक रुपेश भोईर यांचे पालिका आयुक्तांना निवेदन


कल्याण : जलतरण क्षेत्रात कल्याण शहराचे नाव रोशन करण्याऱ्या जलतरण पटू सानिया शेखला पुढील सरावासाठी आर्थिक मदत करण्याची मागणी मनसेने केली असून याबाबत मनसे शहर संघटक रुपेश भोईर यांनी पालिका आयुक्तांना निवेदन दिले आहे.


      कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात वास्तव्यास असलेले खेळाडू विभिन्न क्षेत्रात देशाचा आणि राज्याचे नाव रोशन करीत आहेत. त्यातच कल्याणमध्ये राहणारी पंधरा वर्षांची जलतरण पटू सानिया शेख हिने तर राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचा नेतृत्व करीत सुवर्ण पदक पटकावले आहे. पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी स्वतः तिला आपल्या दालनात बोलवून तिचा सत्कार आणि कौतुक केले आहे.


 सानिया शेख सारख्या खेळाडूना सराव करताना लागणारी आर्थिक मदत महापालिकेतर्फे उपलब्ध करून द्यावीत जेणेकरून सानिया शेख सारख्या मध्यम वर्गीय खेळाडूना उंच शिखर गाठता येईल अशी मागणी मनसे शहर संघटक रुपेश भोईर यांनी पालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

Post a Comment

0 Comments