महाआघाडी सरकारला सुरुंग लावण्यासाठी विरोधकांकडून वल्गना राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांची मनसे भाजपावर टीका

■राष्ट्रवादीच्या अयाज मौलवी यांच्यावतीने इफ्तारी पार्टीचे आयोजन तर जनसंपर्क कार्यालयाचे देखील केले उद्घाटन


कल्याण : सध्या राज्यात भोंग्यावरून राजकारण चांगलेच तापले असून महाआघाडी सरकारला सुरुंग लावण्यासाठी विरोधकांकडून वल्गना सुरु असल्याची टीका राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी मनसे भाजपावर केली. कल्याण पश्चिमेतील गोविंदवाडी परिसरात राष्ट्रवादीच्या अयाज मौलवी यांच्यावतीने इफ्तारी पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. 


यावेळी जगन्नाथ शिंदे बोलत होते. तसेच यावेळी अयाज मौलवी यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे देखील उद्घाटन केले. यावेळी राष्ट्रवादीचे कल्याण डोंबिवली जिल्हा अध्यक्ष जगन्नाथ शिंदेकार्याध्यक्ष वंडार पाटीलप्रदेश प्रवक्ते महेश तपासेरमेश हनुमंतेमहिला जिल्हाध्यक्षा सारीका गायकवाड, नगरसेविका तानजिला मौलवी,   विधानसभा अध्यक्ष संदीप देसाई, सुभाष गायकवाड, श्याम आवारे  आदींसह इतर अनेक पदाधिकारी उपस्थित होते.


काही मंडळी हि सामाजिक शांतता भंग करण्याचे काम करत असून सरकार चांगले काम करत असतांना महाआघाडी सरकारला सुरुंग लावण्यासाठी विरोधी पक्षातील काही नेते वल्गना करत आहेत. सर्व सामान्य नागरिकांना सर्वधर्म समभाव आणि शांतता पाहिजे असून सामाजिक शांतता बिघडवीण्याचे काम जे करतील ते होऊन देणार नाही यासाठी राष्ट्रवादी पक्ष आणि कार्यकर्ता मजबूत असल्याचे जगन्नाथ शिंदे यांनी सांगितले.


 यावेळी त्यांनी मुस्लीम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या. तसेच काही दिवसांपूर्वी अयाज मौलवी आणि त्यांच्या पत्नी नगरसेविका तानजिला मौलवी यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला असून त्यांच्या या पक्षप्रवेशामुळे राष्ट्रवादी पक्ष मजबूत झाला असल्याची प्रतिक्रिया देखील शिंदे यांनी व्यक्त केली.

Post a Comment

0 Comments