३ वर्षानंतर उन्हाळी क्रीडा शिबिरांना सुरुवात


कल्याण : कोरोना जागतिक महामारी नंतर क्रीडा क्षेत्राला आता सुगीचे दिवस येत असून गेली ३ वर्ष बंद असलेले विविध खेळांचे क्रीडा  शिबिरे पुन्हा नव्या जोमाने चालू होताना पहावयला मिळत आहे.


     कल्याणच्या संतोष स्पोर्ट्स क्रिकेट ॲकॅडमीच्या वतीने प्रति वर्षी प्रमाणे यावर्षी उन्हाळी क्रिकेट शिबिराचे आयोजन करण्यात आलेले असून,  हे शिबिर कल्याणच्या आधारवाडी जेल इथे डॉन बॉस्को स्कूल च्या बाजूला संतोष स्पोर्ट्स क्रिकेट ॲकॅडमी (क.डो.म.पा.) च्या क्रिकेट मैदान येथे होणारे होणार आहे. हे शिबिर १५ एप्रिल ते ३१ मे पर्यंत असणार आहे. या शिबिरामध्ये ६ ते १८ या वयोगटातील मुलांसाठी व मुलींसाठी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.


    या शिबिराला मार्गदर्शन करण्यासाठी अनेक नावाजलेले खेळाडू उपस्थित राहणार आहेत. या शिबिराचे सहा गट तयार करण्यात येणार असून हे शिबिर सकाळी साडेसात ते दहा वाजेपर्यंत व संध्याकाळी चार ते सात वाजेपर्यंत या वेळेत घेतला घेतले जाणार असल्याचे संतोष स्पोर्ट्स क्रिकेट ॲकॅडमीचे सचिव संतोष पाठक यांनी सांगितले. अधिक माहितीसाठी ९८७०४२९०४१/ ८१०४७७७९१८.

Post a Comment

0 Comments