गार्डियनलिंक क्रिकेटसाठी जगातील पहिली एनएफटी लाँच करणार भारतातील लोकप्रिय खेळाला वेब३ विश्वामध्ये नेले ~

मुंबई, ४ एप्रिल २०२२ : आधुनिक तंत्रज्ञानासह क्रिकेटचा उत्साह अधिक वाढवत गार्डियनलिंकने जगातील पहिल्या एनएफटी क्रिकेट गेमच्या लाँचची घोषणा केली. गेमचे अधिक लोकशाहीकरण करण्यासाठी गार्डियनलिंकने देशाच्या सर्वात लोकप्रिय खेळासाठी प्ले-टू-अर्न (पी२ई) मोड सक्षम केला आहे. खेळाडू लूट बॉक्‍स जिंकण्यासाठी, लीडरबोर्डसवर अग्रस्थानी पोहोचण्यासाठी, रोख बक्षीसे मिळवण्यासाठी आणि त्यांच्या एनएफटींमध्ये अधिक मूल्याची भर करण्यासाठी त्यांच्या एनएफटी असेट्सचा वापर करू शकतात. अँड्रॉईड, आयओएस व पीसीवर उपलब्ध असणारा हा गेम जम्पडॉटट्रेड वेबसाइटवर लाँच करण्यात येईल, जेथे युजर्स ड्रॉपमध्ये सहभाग घेऊ शकतात.


क्रिकेटसाठी उच्चस्तरीय खेळाचे मैदान तयार करण्यासाठी क्रिकेटप्रेमी व एनएफटी कलेक्टर्स नवीनच लाँच केलेल्या जम्पडॉटट्रेड वेबसाइटवर नोंदणी करू शकतात आणि वेटलिस्टमध्ये सामील होण्यास सुरूवात करू शकतात. हा अद्वितीय गेम समुदाय-केंद्रित आहे आणि खेळाडूंना त्यांच्या पी२ई पर्यायांच्या माध्यमातून त्यांच्या सोईस्कर वेळ व प्रयत्नांसह कमावण्याची संधी देतो. हा मल्टीप्लेअर गेम जगातील सर्वाधिक क्रिकेट चाहते असलेला देश भारतातील, तसेच जगभरातील एनएफटी, गेमिंग व क्रिकेटप्रेमींमध्ये व्यापक प्रमाणात लोकप्रि‍य ठरण्याची अपेक्षा आहे.


गार्डियनलिंकचे सह-संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी रामकुमार सुब्रमण्याम म्‍हणाले, "भारतामध्ये क्रिकेट पाहण्याचा आनंद विशेषत: आजच्या काळात नवीन फॉर्मेट्ससह प्रत्‍येक क्रिकेटप्रेमीसाठी एक ट्रीट बनला आहे. आम्ही भारतातील अग्रणी एनएफटी क्रिकेट गेमच्या लाँचची घोषणा करण्यासाठी हीच वेळ उत्तम मानतो. हा गेम प्रत्येक क्रिकेटप्रेमीला अद्वितीय उत्‍पादन म्‍हणून सेवा देईल. आमचा क्रिकेटसाठी भारतातील पहिले मेटाव्हर्स निर्माण करण्याचा देखील मनसुबा आहे. युजर्स अंतिम ध्येयानुसार मोफत व प्ले-टू-अर्न मोड दोन्ही खेळू शकतात, जे परिपूर्ण मनोरंजनदायी असेल किंवा निष्क्रिय उत्पन्न मिळवून देईल."


खेळाडू रिवॉर्डस् कमावण्यासाठी, मूल्याला चालना देण्यासाठी आणि व्यापार करण्यासाठी एनएफटी इन-गेम असेट्सचा लाभ घेऊ शकतात. दीर्घकाळापर्यंत गेम खेळाडू मालकीहक्‍कावर लक्ष केंद्रित करणारी वैशिष्ट्ये सादर करत राहिल- जसे एनएफटी रिअल-इस्टेट, सानुकूल अवतार आणि प्लेयेबल मेटाव्हर्स, जे गेमिंग व क्रिकेटप्रेमींचे लक्ष वेधून घेतील.

Post a Comment

0 Comments