लोकमान्य-सावरकर नगर परिसरातील रस्ता दुरुस्ती, गटर्स, पदपथ व सुशोभिकरण कामाची महापालिका आयुक्तांनी केली पाहणी सुशोभि करणाची कामे तातडीने पूर्ण करण्याचे दिले निर्देश

■लोकमान्य परिसरातील विविध ठिकाणाची पाहणी करताना महापालिका आयुक्त डॅा. विपिन शर्मा सोबत अतिरिक्त आयुक्त(२)संजय हेरवाडे.

ठाणे : ठाणे महापालिका आयुक्त डॉ.विपिन शर्मा यांचा विविध कामांचा पाहणी दौरा सुट्टीच्या दिवशी देखील सुरूच असून आज लोकमान्य-सावरकर नगर प्रभाग समितीमधील रस्ता दुरुस्ती, गटर्स, पाईपलाईन, स्वच्छता,रंगरंगोटी तसेच सुशोभिकरण कामांची त्यांनी पाहणी करून या परिसरातील सर्व कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित विभागास दिले. 

   

       या पाहणी दौऱ्यास  माजी नगरसेवक दिलीप बारटक्के, दशरथ पालांडे, संतोष वडवले, दिगंबर ठाकूर, माजी नगरसेविका सौ.आशा संदिप डोंगरे, कांचन चिंदरकर,अतिरिक्त आयुक्त(२)संजय हेरवाडे, नगर अभियंता प्रशांत सोनग्रा, उप आयुक्त मनीष जोशी, उप आयुक्त जी. जी. गोदेपुरे, अतिरिक्त नगर अभियंता अर्जुन अहिरे, सहाय्यक आयुक्त सचिन बोरसे, संबंधित कार्यकारी अभियंता, उप अभियंता तसेच इतर महापालिका अधिकारी आदी उपस्थित होते.


       लोकमान्य- सावरकर प्रभाग समितीमधील ठिकठिकाणी परिसर सुशोभिकरण करणे, पोखरण रोड २ वरील बँका तसेच मोठ्या शॉप्सना एरिया ब्युटीशयनमध्ये सामावून घेणे, रस्त्याची दुरुस्ती करणे, रस्ते दुभाजकामध्ये वृक्ष लागवड करणे, अनधिकृतपणे पार्किंग केलेल्या वाहनांवर नियमित कारवाई करणे, शास्त्रीनगर परिसरात पी-१ आणि पी-२ पार्किंग व्यवस्था करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त डॉ. शर्मा यांनी संबंधित विभागास दिले. 

       

      तसेच रस्त्यावरील भिंतींचे सौंदर्यीकरण करणे, रंगरंगोटीच्या माध्यमातून सौंदर्यीकरण करणे, या प्रभाग समितीमधील दुसरे आरोग्य केंद्र तात्काळ सुरू करणे, दुभाजक व ग्रीलवर पेंटीग करणे, खासगी शाळांना रंगरंगोटीच्या माध्यमातून शहर सौंदर्यीकरण उपक्रमात सहभागी करून घेणे, पाणी प्रश्न, शाळांची किरकोळ दुरुस्ती तसेच या परिसरातील सर्व उद्यानाची आवश्यक डागडुजीचे कामे करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. 

       

        दरम्यान लोकमान्य-सावरकर प्रभाग समितीमधील हॉलिवूड थीम पार्कची देखील महापालिका आयुक्त डॉ. शर्मा यांनी पाहणी करून या ठिकाणी संपूर्ण परिसराची स्वच्छता, झाडांच्या फांद्यांची छाटणी, डेब्रिज उचलणे, विद्युत रोषणाई तसेच इतर अत्यावश्यक कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी संबंधितांना दिले. 

Post a Comment

0 Comments