आंतर्राष्ट्रीय मानवाधिकार संघ प्रदेश अध्यक्षपदी डॉ राजु राम यांची नियुक्ती


कल्याण : आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघ (भारत) या राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या राष्ट्रीय कार्यकरणीची घोषणा झाली. यामध्ये संघटनेच्या देशातील सर्व राज्यातील प्रमुख पदाधिकारी यांच्या संमतीने सर्वांनुमते जेष्ठ सामाजिकमानवाधिकार हक्क कार्यकर्ते डॉ राजु राम यांच्या मानवाधिकार तथा सामाजिक कार्य पाहतात्यांचा महाराष्ट्रातील राष्ट्रीय पातळीवरील जनसंपर्कप्रशासना सोबतचा जनसंपर्क बघता ॲड. डॉ राजु राम यांची नियुक्ती एकामताने महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष करण्याचा निर्णय करण्यात आला.


नवी दिल्ली येथे त्यांना नवीन जवाबदारीची धुरा सोपविण्यात आली. यावेळी डॉ राजु राम यांनी आपले विचार व्यक्त केले की "सर्वसामान्य अन्यायग्रस्त पिढीतांना न्याय देण्याचा मी सदैव प्रामाणिक प्रयत्न करेन जसे आजवर न्यायासाठी काम केले आहे". डॉ. राम यांच्या प्रदेश अध्यक्ष नियुक्तीमुळे जनतेमध्ये चांगल्या भावना व्यक्त केल्या जात आहे व शुभेच्छांचा वर्षाव व्यक्त होत आहेत.

Post a Comment

0 Comments