ठाणे जांभळी नाका येथील चैत्र नवरात्रोत्सवात महाराष्ट्रातील लोकसंस्कृतीचे दर्शन - लोकशाहीर विट्ठल उमप थियेटर प्रस्तुत 'मी मराठी

'


ठाणे , प्रतिनिधी  | आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित होत असलेल्या जांभळी नाका येथील शिवाजी मैदान चैत्रनवरात्रोत्सव २०२२ भक्ती व कला महोत्सवाच्या नवव्या दिवशी लोकशाहीर विट्ठल उमप थियेटर प्रस्तुत मी मराठी निर्माता नंदेश विट्ठल उमप यांचा लोक कलेचा कार्यक्रम आयोजक राजन विचारे यांच्याकडून आयोजित करण्यात आला होता.


त्यामध्ये महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचे दर्शन ठाणेकरांना घडले त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची स्तुती, पोवाडा, भजन, विठ्ठलाचे अभंग, गण-गवळण, लावणी, कवने, धनगरी नृत्य, गीते, नंदीबैल, वासुदेव, डोंबारी, पोतराज, गोंधळी आणि सर्व मराठी सण उत्सवाची गीते यांची कलाकृती असे अस्सल मऱ्हाटमोळी कलाप्रकार होते. त्यामधील संकल्पना लेखन संगीत नंदेश उमप यांची होती. 


या कार्यक्रमासाठी ठाणेकर नागरिकांनी उपस्थिती नोंदवली होती. संपूर्ण परिसर भक्तिमय रंगला होता. तसेच सुप्रसिध्द प्रधानाचार्य व यज्ञाचार्य वे. शा. सं. मुकुंदशास्ञी मुळे (नाशिक) यांच्या मार्गदर्शनाखाली भव्यदिव्य नवकुंडात्मक सहस्त्रचंडी महायागाच्या शेवटच्या म्हणजे नवव्या दिवशी पुर्णाहूती विधी खासदार राजन विचारे यांच्या हस्ते संपन्न झाला.


या चैत्र नवरात्र उत्सवात एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, खासदार अरविंद सावंत, डॉ. श्रीकांत शिंदे व त्यांच्या पत्नी तसेच आमदार सुभाष भोईर यांनी कुटुंबासोबत देवीचे दर्शन घेतले. 


तसेच सिडकोचे माजी संचालक नामदेव भगत, मिरा भाइंदर महानगरपालिकेचे माझी विरोधी पक्षनेते राजू भोईर, नगरसेविका भावना भोईर, लक्ष्मण जंगम तसेच युवासेना/युवतीसेना व शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments