महाराष्ट्रसह देश मोठा करायचा असेल तर महापुरुषांच्या विचाराने देश पुढे जाईल - पार्थ पोळके जेष्ठ विद्रोही साहित्यीक

 


कल्याण :  महाराष्ट्रसह देश मोठा करायचा असेल तर महापुरुषांच्या विचाराने देश पुढे जाईल असे मत  जेष्ठ विद्रोही साहित्यीक पार्थ पोळके यांनी व्यक्त केले.
कल्याण-डोंबिवली महानगर पालिका बहुजन कर्मचारी परिवर्तन संस्था आयोजित छत्रपती शिवाजी महाराज,क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व राष्ट्रनिर्माते भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती महोत्सवा निमित्त अत्रे नाट्यगृह कल्याण पश्चिम या ठिकाणी बोलत होते. 


यावेळी विचार मंचकावर उपस्थित प्रमुख वक्ते पार्थ पोळके सुनिल पवार अतिरिक्त आयुक्त कडोंमपा उपायुक्त अण्णासाहेब बोडदे उप आयुक्त पिंपरी चिंचवड महानगरपालिका रमेश जाधव माजी महापौर संस्था अध्यक्ष चंद्रकांत पोळ जयंती समिती अध्यक्ष प्रकाश मोरे अनघा पवार विजय सरकटे उपस्थित होते.


कार्यक्रमाचे प्रस्थाविक संस्था अध्यक्ष चंद्रकांत पोळ यांनी केले असून जयंती समिती अध्यक्ष प्रकाश मोरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तर प्रबोधन सत्राचे अध्यक्ष माजी महापौर रमेश जाधव आणि पालिका अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांनी उद्घाटन प्रसंगी चोवीस वर्षांच्या सेवेतील ही शासकिय जयंती कुठेही अशी होत नाही ते मी या ठिकाणी अनुभवल ही खूपच गौरवशाली बाब असून संस्था अध्यक्ष चंद्रकांत पोळ यांचे सह सर्वांचे कौतुक केले.

 
प्रमुख  वक्ते पार्थ पोळके असे म्हणाले की जर आपला देश पुढे घेऊन जायचे असेल तर राष्ट्रीय महापुरुषांचे विचार घेऊनच देश पुढे जाईल. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत अधिकारी आणि कर्मचारी हे राष्ट्रीय महापुरुषांच्या जयंतीनिमित्त एकत्र येतात हीच खरी राष्ट्रीय महापुरुषांची जयंती होय. 


आम्ही इतिहासाचे ज्ञान आणि भाषेचे जाण ठेवतो कारण या देशामध्ये सामाजिक सलोखा आणि शांतता भंग करण्याचे प्रयत्न चालू आहेत. महागाई,बेरोजगारी पेट्रोल डिझेल शिक्षण शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यापेक्षा आम्हाला हनुमान चालीसा भोंगे हिजाब आणि मुसलमान या चार प्रश्नांवर आज चर्चा सुरू केली आहे. 


या चार प्रश्नामुळे देश पुढे जाईल का देश पूढे घेऊन जायचे असेल तर बुद्ध छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले डॉ बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शाहू महाराज आणि संविधानाच्या विचाराने देशाची प्रगती होईल. या देशामध्ये बाहेरून आलेले वैदिक हे हिंदू कसे समजायचे इ.स.चारशे वर्षांपूर्वी माणसाला जर माणसां सारख वागवलं जात नसेल तर मग कशाला लोक हिंदू धर्मात राहतील कारण हिंदू आणि वैदिक यामध्ये कित्येक वर्षांपासून भांडण चालु आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा यांचा राज्यभिषेक नाकारला त्यांनी स्वतःला हिंदू म्हणून घेऊ नये. 


या संयुक्त जयंती महोत्सवाला मनपाचे अतिरिक्त आयुक्त सुनील पवार, शहर अभियंता सपना कोळी-देवनपल्ली, उपायुक्त- बाळासाहेब चव्हाण,उपायुक्त पल्लवी भागवत कार्यकारी अभियंता सुभाष पाटील हे आवर्जून उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
   

यंदाच्या वर्षी या जयंती महोत्सवात शाळकरी मुलांनी इंधन व वीज बचत काळाची गरज दर्शविणारी चित्र कला प्रदर्शन,प्लास्टिक मुक्त कल्याण-डोंबिवली चित्र प्रदर्शन(सहभाग पर्यावरण रक्षक मंडळ,डोंबिवली) चित्राचे प्रदर्शन व चित्रकला स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते.महापुरुषांच्या कार्यावरील चित्र प्रदर्शन हे विशेष आकर्षण ठरले.नागरिकांना चित्र किल्ल्याचे दर्शन पाहायला मिळाले. तसेच आरोग्य शिबीर,नेत्र तपासणी,कॅल्शियम तपासणी,थायरॉईड तपासणी, हिमोग्लोबिन तपासणी,मोफत औषध व चष्मा वाटप करण्यात आले होते. 


या कार्यक्रमासाठी भूषण कोकणे,सुनिल अंबाडे,श्रीकांत वाघमारे, राहुल वाघ,संतोष हेरोडे, नागेश टोळ, कल्पना खरात,युगा नलावडे,पौर्णिमा कांबळे,नवनीत गायकवाड, सूर्यभान कर्डक, भाऊराव पंडित, संजय सर्वोगोड, भालचंद्र गायकवाड,विलास गायकवाड, यांच्यासह आदींनी परिश्रम घेतले असून सूत्रसंचालन आणि उपस्थितांचे आभार प्रदर्शन विजय सरकटे यांनी केले.

Post a Comment

0 Comments