अखेर इरफान शेख यांचा मनसेला जय महाराष्ट्र "राज" साहेब अश्या शक्तींच्या मागे आपल्याला जायची गरजच का आली ? - मनसे प्रदेश सचिव


कल्याण : मुस्लिम द्वेषाच्या धंद्यांवर ज्यांचे राजकारण चालतं. त्यांना मस्जिदच्या भोंग्या पासून त्रास होतो.  मदरस्यानां बदमान करायचं काम त्यांचं आहे. अश्या शक्तींच्या मागे आपल्याला जायची गरजच का आली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला असल्या राजकारणाची गरज का पडलीअसा सवाल राज ठाकरे यांना करत मनसेचे प्रदेश सचिव इरफान शेख यांनी आज पदाचा राजीनामा देत  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला  शेवटचा 'जय महाराष्ट्रकेला आहे.


       मशिदीवरील भोंगे खाली उतरण्यासाठी पाडाव्याच्या सभेला राज ठाकरे यांनी भाषणात जाहीर करताच  राज्यातील वातावरण तापले.  त्यातच इरफान शेख यांनी राज ठाकरेंच्या त्या वक्तव्यावरून सोशल मीडियावर सभेच्या दुसऱ्याच दिवशी नाराजी व्यक्त केली होती. आणि आज राजीनामा देताना इरफान शेख म्हणतात कि,   खरं तर कधी अशी परिस्थिती समोर येईल असं वाटलं नव्हतं. मात्र आपण ज्या पक्षात काम करतो. 


         ज्या पक्षाला आपलं सर्वस्व समजतो. तोच पक्ष जर आपण ज्या समाजातून येतो.  त्या समाजाच्या विरोधात द्वेषात्मक भुमीका घेत असेल.  आणि स्वतः पक्षाध्यक्षच जर भुमीका घेत असतील तर नक्कीच पक्षाला शेवटचा 'जय महाराष्ट्रम्हणण्याची वेळ आल्याचे दुःख इरफान शेख यांनी व्यक्त केले आहे. 

      

          इरफान शेख १६ वर्ष मनसेचे पदाधिकारी म्हणून कार्यरत होते. तेव्हापासून राज ठाकरे यांच्या मनातील ब्लु प्रिंट, विकासाच्या भव्य दिव्य कल्पना एक दिवशी अचानक मस्जिदीवरील भोंगे आणि मदरस्यावर येऊन थांबतात.  तेंव्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा कार्यकर्ता म्हणून काहीतरी चुकीचं घडतंय हे सहज लक्षात येऊन जात. पक्ष स्थापन झाला तेंव्हा भूमिका होती की जातीपाती विरहित राजकारण करायचं. 


         म्हणून सर्व जाती धर्माचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते पक्षात आहेत.  आणि जीवतोड मेहनत देखील करत आहेत. पक्षाचा झेंडा देखील सर्वसमावेशक होता. राज ठाकरे म्हणजे आशेचा एक नवा किरण होते.  मात्र पाडव्याच्या सभेत वेगळंच काहीतरी पाहायला आणि ऐकायला भेटल असे भावनिक उद्गार इरफान शेख यांनी पत्रकाराशी बोलताना केले.


       इरफान शेख पुढे म्हणतात किराज ठाकरे कित्येक गोरगरिबांच्या मुलांचे मदरस्यात शिक्षण होते. तिथे कधीच काही चुकीचं होत नाही. नसेल तर माझ्या सोबत चला मी दाखवतो मदरसे. मात्र बदनामी का मी ही एक राष्ट्रप्रेमी महाराष्ट्रातील मराठी मुसलमान आहे. एखाद्या समाजाला टार्गेट करून राजकारण करणं चुकीचं आहे. 


      आणि त्या चुकीच्या गोष्टीत त्याच पीडित समाजाचा भाग म्हणून सहभागी होणे म्हणजे स्वतःशीच बेईमानी करण्यासारख आहे. त्यामुळे पक्षाच्या पदाचा प्राथमिक सदस्यत्वाचा मी राजीनामा देत असल्याचे राजीनामा पत्रात नमूद केले आहे.

Post a Comment

0 Comments