उसने पैश्याच्या वादातून महिलेची हत्या... एकाला अटक

 


डोंबिवली ( शंकर जाधव ) उसने पैसे मागण्याच्या वादातून एका महिलेची चुकीने सपासप वार करून निर्घृण हत्या केल्याची घटना कल्याण पूर्वेकडील चक्की नाका येथील शास्त्रीनगर टेकडजवळील परिसरात घडली. हत्येप्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी एकाला एकाला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विजय राजभर  असे अटक आरोपाचे नाव आहे.तर या हल्ल्यात रंजना राजेश जयस्वाल ( ४५) असे मयत महिलेचे नाव असून तीचा पार्लरचा व्यवसाय होता. 


रंजना हिचे तिचा मित्र अजय आनंद राजभर याला तिने एक लाख रुपये उधारीवर दिले होते. मात्र ते उधारीचे पैसे परत देत नव्हता. अखेर आपले पैसे मिळत नसल्याने तिने त्याच्या रात्री घरी जाऊन विचारणा केली असता, अजय घरी नसताना त्याचा भाऊ विजय राजभर आणि त्याची आई लालसादेवी राजभर यांच्यामध्ये जोराची भांडण झाले.


अखेर हे भांडण पुढे हाणामारीत होऊन विजय राजभर आणि लालसादेवी यांनी संगनमत करून महिला रंजना जयस्वाल हिच्या अंगावर चाकूने सपासपवार करून रंजनाची हत्या केली. या  प्रकरणी कोळसेवाडी पोलिस ठाण्यात विजय आणि लालसादेवी या दोघांवर हत्येचा  गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनीआरोपी विजयला अटक केली आहे.

Post a Comment

0 Comments